IPL 2023 : स्टार स्पोर्ट्सने दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्राची केली हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 List of Commentators for Hindi and English Commentary aakash chopra has been sacked by Star Sports

IPL 2023 : स्टार स्पोर्ट्सने दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्राची केली हकालपट्टी

IPL 2023 Star Sports : आयपीएल 2023च्या 16व्या हंगामाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 31 मार्च पासून आयपीएलचा हा थरार रंगणार आहे. आयपीएल सामन्यांमधील समालोचनामुळे खेळात भर पडते म्हणजे मज्जा येते. प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला जबरदस्त कॉमेंट्री पाहायला मिळते, यावेळीही तेच असेल.

IPL 2023 च्या हिंदी आणि इंग्रजी समालोचकांची संपूर्ण यादी समोर आली आहे. मात्र या यादीत दिग्गज हिंदी समालोचक आकाश चोप्रा दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे स्टार स्पोर्ट्सने दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्राची हकालपट्टी केली.(IPL 2023 List of Commentators for Hindi and English Commentary)

त्याचबरोबर काही वेगळे आणि नवे कमेंटेटरही यावेळी पाहायला मिळणार आहेत. इरफान पठाणसोबत त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण आयपीएलमध्ये हिंदी कॉमेंट्री करताना झळकणार आहे.

अशा परिस्थितीत त्यांचे कमेंटेटर ऐकणे हा एक नवीन अनुभव असेल. युसूफ त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जात होता, परंतु कमेंटेटर हा त्याच्यासाठी नवीन अनुभव असेल. आयपीएलच्या या हंगामातील कमेंटेटरची यादी जाणून घेऊया.

31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 16व्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये खेळल्या जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 70 साखळी सामने खेळले जातील. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल.

हिंदी कमेंटेटरची यादी

वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, इम्रान ताहिर, दीपदास गुप्ता, अजय मेहरा, पदमजीत सेहरावत आणि जतीन सप्रू यांचा समावेश असेल.

इंग्रजी कमेंटेटरची यादी

सुनील गावस्कर, जॅक कॅलिस, मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, अॅरॉन फिंच, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, डॅनियल व्हिटोरी, डॅनियल मॉरिसन आणि डेव्हिड हसी.