Mitchell Johnson accuses BCCI : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्यात आली होती. मात्र, ही स्पर्धा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी मायदेशी परतलेले अनेक विदेशी खेळाडू भारतात परत आले आहेत, तर काहींनी भारतात येण्यास नकार दिला आहे. अशातच, भारतात परत येण्यासाठी बीसीसीआयकडून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिशेल जॉन्सनने केला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.