
यंदाच्या आयपीएल हंगामात अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबला ६ धावांनी हरवलं. यासह आरसीबीने पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीनं पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाब सामना जिंकेल असं वाटत असतानाच अखेरच्या क्षणी ६ धावा कमी पडल्या. शशांक सिंहने शेवटी प्रयत्न केला पण विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अंतिम सामन्यात पंजाबच्या पराभवाला पाच जण कारणीभूत ठरले.