IPL 2020 : आयपीएलच्या लिलावात लक्षवेधी ठरलेली ती तरुणी आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl auction 2020 kaviya maran sunrisers hyderabad social media Photo Source : NDTV.com

अनेकांनी तिला गुगल, फेसबुकवर सर्च केलंय. त्या तरुणीचं नाव काव्या मारन असल्याचं स्पष्ट झालंय. 

IPL 2020 : आयपीएलच्या लिलावात लक्षवेधी ठरलेली ती तरुणी आहे तरी कोण?

IPL Auction 2020 : आयपीएलच्या 2020च्या सिझनसाठी 19 डिसेंबरला कोलकात्यात खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलालावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा राहिला. खेळाडूंच्या लिलावाबरोबरच चर्चा झाली ती, लिलावातल्या एका तरुणीची. ती तरुणी कोण आहे? असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी उपस्थित केलाय. अनेकांनी तिला गुगल, फेसबुकवर सर्च केलंय. त्या तरुणीचं नाव काव्या मारन असल्याचं स्पष्ट झालंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅमेरे झाले फोकस
गुरुवारी आयपीएलचे लिलाव होत असताना सनराजयझर्स हैदराबादकडून मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन तसेच कोच ट्रेवर बेलिस लिलाव प्रक्रियेत भाग घेत होते. त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एका तरुणींनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. कॅमरेही तिच्यावर अधून-मधून फोकस होत होते. ही तरुणी कोण? असा सस्पेन्स क्रिकेट वर्तुळात तयार झाला. सनराजयझर्स हैदराबादला आपल्याला हवे ते खेळाडू घेण्यासाठी जवळपास एक तास लागला. पण, या तासाभरात त्या तरुणीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. 

आणखी वाचा - पाणीपुरी विकाणारा आयपीएलमध्ये झाला मालामाल

आणखी वाचा - वयाच्या 48व्या वर्षी मिळवलं आयपीएल टीममध्ये स्थान

कोण आहे ही तरुणी?
कॅमेऱ्यांचं लक्ष वेधलेली ही तरुणी दुसरी-तिसरी कोणी नाही तर, सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिथ मारन यांची मुलगी आहे. त्या तरुणीचं नाव काव्या मारन असून, ती 27 वर्षांची आहे. मुळात काव्या 2018च्या आयपीएलमध्येच प्रकाशझोतात आली होती. कोलकाता नाईट रायडर्सविरोधातील हैदराबादमधील सामन्यात तिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. काव्यानं चेन्नईतून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलंय. आता तिचा संपूर्ण फोकस हा आयपीएलच असणार आहे. काव्याला क्रिकेटची प्रचंड आवड असून, ती SUN टीव्ही आणि SUN टीव्हीच्या एफएम चॅनलसाठीही काम करते. 

टॅग्स :CricketGoa