esakal | पाणीपुरी विकणारा आयपीएलमध्ये मालामाल
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्वी जैसवाल

पाणीपुरी विकणारा आयपीएलमध्ये मालामाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः  आयपीएल क्रिकेट  विश्वातील सर्वात श्रीमंत लीग. केवळ भारतीय नव्हे तर क्रिकेट विश्वातील भल्या भल्यांना या स्पर्धेत खेळण्याठी भुरळ पडलेली असते. एक दोन आयपीएल खेळले तर गलेलठ्ठ पैसा मिळतो. बँक बॅलंस वाढत असतो. ही लीग अनेकांचे स्वप्न पूर्ण करते. काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी तर देशाऐवदी आयपीएलला पसंती दिलेली आहे. मग हीच आयपीएल जेव्हा एका पाणीपुरी विकणाऱ्या मुलाचे लिलावात मोठी रक्कम मिळण्याचे स्वप्न पूर्ण करते तेव्हा अख्खे क्रिकेट धन्य होत असते....

उत्तरप्रदेशातून महामुंबईत इतरांप्रमाणे आपलेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या जैसवाल या मुलाची ही यशस्वी कहाणी आहे. आज झालेल्या आयपीएल लिलावात यशस्वी 17  वर्षीय यशस्वी जैसवालसाठी 2.40 कोटींची बोली लागली. अभिनेता शहारुख खान सहमालक असलेल्या कोलकाता नाईटरायडर्स संघाने यशस्वीचे क्रिकेट विश्वातील पहिले पाऊल सार्थकी केले.

गरिबीतून पुढे येत  देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करणारे काही खेळाडू सापडतील पण यशस्वीची कहाणी हेलावणारी आहे. वयाच्या 11वर्षी तो मुंबईत इतरांप्रमाणे आपलेही क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पर्ण करण्यासाठी आला. पण घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईनगरीत त्याचे स्वप्न ऐकून घ्यायला तरी वेळ आहे कोणाकडे, पण यशस्वी हार मानण्यातला नव्हता...

आझाद मैदानातील मुस्लीम युनायटेड स्पोर्टस् क्लबला लागूनच असलेल्या टेंटमध्ये तो तब्बल तीन वर्षे रहात होता. वेळ काढून तो तेथेच खेळायचा. मैदानातच रहात असल्यामुळे खेळायचा प्रश्न नव्हता पण पोटापाण्याचे काय हा प्रश्न होता. सकाळी सामने खेळायचे, शतके करायची आणि सायंकाळी मैदानातच शेवपरी-भेळपूरी विकून यशस्वी उदरनिर्वाह आणि खेळासाठी पैसे स्वतःच मिळवायचा.

यशस्वीकडे कमालीची गुणवत्ता होती. धावांचा पाऊस शतकांची माळ ओवणाऱ्या यशस्वीला अखेर मुंबई क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. 17 व्या वर्षीच विजय हजारे क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेटचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. आणि एकाच सामन्यात त्याने 154
चेंडूत  203 धावांची खेळी केली आणि तेथून प्रवास सुरु झाला. कोण हा यशस्वी अशी सर्वत्र विचारणा होऊ लागली...

काही दिवसांपूर्वीच त्याला देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. 19 र्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात त्याची निवड झाली हा आनंद गगनात मावेनासा होत असतानाच आयपीएल लिलावात त्याला 2.40 रक्कम मिळाली. लवकरचा तो भारताच्या मुख्य संघात स्थान मिळवले तर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसणार नाही.
 

loading image