IPL Cricket 2025 : गतविजेत्या केकेआरची परिस्थिती वाईट का? याची कोणती ५ कारणे? जाणून घ्या!

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी सुरू आहे.
kkr cricket team
kkr cricket teamsakal
Updated on

- ऋषिकेश गोळे

कोलकाता नाईट रायडर्स संघ २०२५ च्या आयपीएल'मध्ये विजयासाठी आतुर असा वाटत नाही. कारण आतापर्यंत संघाला आठ (८) सामन्यांमध्ये पाच (५) पराभवाला सामोरे जावे लागले.

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी सुरू आहे. संघाला आठ (८) सामन्यांत फक्त तीन (३) वेळा विजय मिळवता आला आहे. परिणामी केकेआर गुण तक्त्यामध्ये सातव्या क्रमांकावर आहे. संघाची फलंदाजी पूर्णपणे या हंगामात अपयशी ठरली आहे.

ईडन गार्डन्स मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध केकेआरचे फलंदाज १९९ धावांचे लक्ष्य गाठू शकले नाहीत. तसेच पंजाब किंग्जविरुद्ध ११२ धावांचा पाठलाग केकेआर संघाला करता आला नाही. केकेआरच्या याच निराशाजनक कामगिरीची नेमकी कारणे काय जाणून घेऊया.

१) व्यंकटेश अय्यरवर खर्च करून सुद्धा फलित नाही

यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआर संघातील सर्वात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यर आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केली नाही. तसेच त्याच्यावर २३ कोटी ७५ लाख रुपये संघाने खर्च केले आहेत. व्यंकटेश अय्यर एक चांगला फलंदाज आहे. पण त्याच्यावर केलेल्या खर्चाचे फलित कामगिरीमधून दाखवू शकला नाही. व्यंकटेश अय्यरने गोलंदाजी सुद्धा प्रभावीपणे केली नाही. तरी अशा परिस्थितीत इतके पैसे खर्च करणे हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे.

२) गोलंदाजी सुद्धा पूर्ण प्रभावीपणे नाही

गेल्या हंगामात केकेआरचे सर्व गोलंदाज फॉर्ममध्ये होते. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २१ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने ही प्रत्येकी १९ विकेट्स घेतल्या. सुनील नारायण आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी १७ विकेट्स तर वैभव अरोराने ११ विकेट्स घेतल्या होत्या. या हंगामात मात्र कोणताही गोलंदाज प्रभावी ठरलेला नाही. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप १० गोलंदाजांमध्ये केकेआर संघाच्या फक्त एकाच खेळाडूचे नाव असून तो सुद्धा १० व्या क्रमांकावर आहे.

३) संघाने कर्णधाराला टिकवून ठेवले नाही

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली विजयी पथाका पटकवली होती. परंतु लिलावाआधी श्रेयस अय्यरला संघातून बाहेर पडावे लागले. संघाने अय्यरला टिकवून ठेवले नाही. त्याचाच फटका या वर्षी संघाला सहन करावा लागत आहे.

४) संघाने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नाकारले

मागील वर्षी आयपीएल मध्ये फिल साल्ट याने केकेआरला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. १२ सामन्यांमध्ये साल्ट याने ४० च्या सरासरीने आणि १८२ च्या स्ट्राईक रेटने ४३५ धावा केल्या. परंतु फ्रँचायझीने साल्टला सोडून खूप मोठे नुकसान केले आहे. यंदाच्या हंगामात फिल साल्ट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघात खेळ असून, त्याने ८ सामन्यांत २६.६३ च्या सरासरीने २१३ धावा काढल्या आहेत.

५) रमणदीप सिंगचा काय उपयोग?

रमणदीप सिंगने आयपीएल २०२४ मध्ये केकेआर संघासाठी चांगली कामगिरी केली असली. तरी यंदाच्या आयपीएल मध्ये संघाच्या दबावाखाली तो उत्तम कामगिरी करू शकला नाही. रमणदीप सिंगने यंदाच्या आयपीएल मध्ये ८ सामन्यांमध्ये फक्त ३० धावा केल्या असून, गोलंदाजी सुद्धा उत्तम प्रकारे केली नाही. आणि त्याचाच फटका कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com