यंदा क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा उंचावला 

in IPL field has increased considerably
in IPL field has increased considerably

मुंबई - 44 दिवस आणि 56 अप्रतिम सामने झाल्यानंतर आयपीएल 2018च्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. यंदाचा मोसम छानच ठरला आहे. साखळीच्या दुसऱ्या टप्यात गुणतक्‍त्यात नाट्यमय बदल झाले. तळातील संघांनी संघर्ष करीत आघाडी घेण्यापर्यंत मजल मारली. दुसरीकडे एक वेळ आघाडी घेतलेल्या पंजाबने लय गमावली आणि पुन्हा एकदा त्यांचे आव्हान साखळीत आटोपले. शेवटी टी-20 क्रिकेटमध्ये केवळ वेगाने धावा करणेच नव्हे तर धूर्त खेळ आणि डावपेचांची अचूक अंमलबजावणी सुद्धा महत्त्वाची असते. 

यंदा आपण नवोदीत रिषभ पंत याला भरारी घेताना पाहिले. त्याने अद्वितीय फलंदाजी केली. रशीद खानचा भेदक फिरकी मारा, मुजीबचे अतुलनीय स्पेल, के. गौतम आणि श्रेयस गोपाल यांची मोक्‍याच्या वेळी अष्टपैलू कामगिरी अशी वैशिष्ट्येही सांगता येतील. गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार खेळ झाला, पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा उंचावला. एबी डिव्हिलियर्सचा "सुपरमॅन'सारखा झेल असो किंवा बोल्टचा सनसनाटी झेळ असो यंदा क्षेत्ररक्षण प्रभावी झाले. तरुण खेळाडू मैदानावर झोकून देत होते. याच प्रमाणे अनुभवी खेळाडूंनी तीव्र स्पर्धा निर्माण करणेसुद्धा आनंददायक ठरले. 

प्रत्येक सामन्याला कलाटणी मिळाली. त्यामुळे थोड्याच संघांनी सातत्य राखले. स्टार खेळाडू नसूनसुद्धा हैदराबादने सर्वाधिक भक्कम कामगिरी केली. कर्णधार विल्यम्सन याने पुढाकार घेतला आणि तो संघाचा तारणहार बनला. मुंबईविरुद्ध माफक आव्हानासमोर त्याने गोलंदाजीत केलेले धुर्त बदल निसटत्या विजयात निर्णायक ठरले. 

चेन्नईने पूर्वीप्रमाणेच भक्कम खेळ केला. धोनीसारखा चाणाक्ष आणि चपळ यष्टिरक्षक कर्णधार असल्यामुळे हा संघ चांगली कामगिरी करणे स्वाभाविकच असते. कर्णधार जितका महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्व सांघिक खेळ करणाऱ्या खेळाडूंना द्यावे लागेल. लुंगी एन्गिडीच्या अचूक गोलंदाजी किंवा सुरेश रैनाच्या धूर्त फलंदाजीमुळे त्यांना सांघिक खेळाचा फॉर्म्युला गवसला. 

राजस्थानने मोक्‍याच्या वेळी जिद्दीने कामगिरी केली आणि प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविले. आता त्यांच्यासमोर दोन वेळच्या विजेत्या कोलकात्याचे आव्हान असेल. 

प्ले-ऑफ सामने साखळीप्रमाणे होणार नाहीत. याचे कारण संघांना लय गवसली आहे. त्यामुळे निकालाचे भाकीत वर्तविणे कठीण असेल. चारही संघांनी पूर्वी विजेतेपदाचा आनंद लुटला आहे. त्यामुळे याची पुनरावृत्ती करण्यास ते सज्ज झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com