आफ्रिकेतील टी 20 लीग टीम लिलावात IPL फेंचायजींचा 'व्हाईट वॉश'

IPL Franchise Buy All 6 Teams In South Africa T20 League
IPL Franchise Buy All 6 Teams In South Africa T20 Leagueesakal

केपटाऊन : क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) पुढच्या वर्षी एक नवी टी 20 लीग (T20 league) सुरू करणार आहे. या लीगसाठीच्या सहा संघाची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलाव प्रक्रियेत आयपीएलच्या फ्रेंचायजींनी (IPL Franchise) व्हाईट वॉशच दिली. सर्व सहा संघांवर आयपीएल फ्रेंचायजींनी आपली मोहर उमटवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेच्या या लीगला आयपीएल म्हणूनच संबोधले जात आहे. मुंबई इंडियन्स(MI), चेन्नई सुपर किंग्ज(CSK), लखनौ सुपर जायंट्स(LSG), सनराईजर्स हैदराबाद(SRH), राजस्थान रॉयल्स(RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांनी दक्षिण आफ्रिकेतील या नव्या टी 20 लीगमधील सगळे 6 संघ या संघांनी विकत घेतले आहेत.

IPL Franchise Buy All 6 Teams In South Africa T20 League
ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराहचा अव्वल क्रमांक कोणी हिसकावला?

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे निर्देशक आणि माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने या सर्व फ्रेंचायजींचे अभिनंदन केले. तो म्हणाला की, 'आम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका लीगच्या फ्रेंचायजी मालकांचे स्वागत करतो. हा दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी एक रोमहर्षक क्षण आहे.' या लीगचा कमिश्नर ग्रॅम स्मिथ पुढे म्हणाला की, 'यावरून जागतिक क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेचे महत्व अजूनही अबाधित आहे.'

IPL Franchise Buy All 6 Teams In South Africa T20 League
ISSF World Cups : नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये भारत पदक तालिकेत 'टॉप'

साऊथ आफ्रिका टी 20 लीग आणि संघ मालक

  • केपटाऊन फ्रेंचायजी - मुंबई इंडियन्सचे मालक

  • जोहान्सबर्ग फ्रेंचायजी - सीएसकेचे मालक

  • डर्बन फ्रेंचायजी - लखनौ सुपर जायंटचे मालक

  • प्रिटोरिया फ्रेंचायजी - दिल्ली कॅपिटल्सचे मालक

  • पार्ल फ्रेंचायजी - राजस्थान रॉयल्स मालक

  • पोर्ट एलिझाबेथ फ्रेंचायजी - सनराईजर्स हैदराबादचे मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com