esakal | IPL Postpond : सोशल मीडियावर चाहते सैराट; मीम्समधून केली 'मन की बात'

बोलून बातमी शोधा

IPL Postpond : सोशल मीडियावर चाहते सैराट; मीम्समधून केली 'मन की बात'

IPL Postpond : सोशल मीडियावर चाहते सैराट; मीम्समधून केली 'मन की बात'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IPL 2021 Suspended : बायो बबलमध्ये कोरोना विषाणूनं छेद केल्यानंतर एकानंतर एक खेळाडू पॉझिटिव्ह येत होते. वाढता धोका पाहता बीसीसीआयनं उर्वरित आयपीएल सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद संघातील खळाडू आणि सपोर्ट स्टाप यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पुढील सुचना मिळेपर्यंत अनिच्छित कालावधीसाठी आयपीएल स्पर्धा स्थगित (IPL 2021 Suspended) करण्यात आली. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण यंदा बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धा मायदेशी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) ताफ्यातील वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वारियर (Sandeep Warrier) यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धा रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली... पाहूयात नेटकऱ्यांची मन की बात...

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'