
वयात काय असतं! शेन वॉर्न-मुनाफ पटेल यांच्यातील किस्सा
आयपीएलच्या पहिल्या वहिल्या हंगामात शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार झाला त्यावेळी त्याला भारतीय खेळाडूंची मानसिकता लक्षात आली. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले वरिष्ठ खेळाडू आपल्याला मान मिळावा, या भावनेतून वावरतात हे त्याच्या लक्षात आले. संघाचे नेतृत्व करताना सर्वांशी जुळवून घेण्यासाठी सर्वांसाठी नियम समान करायला हवे, असा विचार शेन वॉर्नने पक्का केला. मुनाफ पटेलच्या वयासंदर्भाचा किस्साही वॉर्नने त्याच्या 'नो स्पिन' या पुस्तकातून शेअर केलाय. ज्यावेळी वॉर्नने मुनाफ पटेलला वय विचारले त्यावेळी त्याला प्रतिप्रश्नाचा सामना करावा लागला होता. कप्टन तुम्हाला माझे खरे वय जाणून घ्यायचंय की आयपीएलमधील. अशा तोऱ्यात मुनाफ पटेल याने शेन वॉर्नची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता. (IPL Rajashan Royals shane warne On Munaf Patels age )
हेही वाचा: BLOG: पार्ट टाईम फिरकीचा चेहरा बदलणारा 'वॉर्नी'
पण संयमी आणि नेतृत्वाची क्षमता असलेल्या वॉर्ननं भारतीय गोलंदाजाचा बाउन्सर नीट ओळखला. संयमी भूमिका घेत त्याने तुझ वय सहजच जाणून घ्यायच आहे, अशा शब्दांत वॉर्नन पुन्हा त्याला उत्तर दिले. यावेळी मुनाफ पटेलन दिलेल्या उत्तराने वॉर्न प्रभावित झाला. मी 24 चा आहे पण माझे खरे वय 34 आहे. मी आयपीएलचे वय 24 सांगतोय कारण मला खूप काळ खेळायचे आहे. जर मी 34 वर्षांचा असेल तर मला कोणीही सिलेक्ट करणार नाही. त्यामुळे मी 30 पेक्षा कमी वय ठेवायचा प्रयत्न करेन, असे गंमतीशीर आणि खेळण्यासाठी अभी तो मै जवान हू...अशा स्टाईलमध्ये मुनाफ पटेलनं वॉर्नला प्रभावित केले होते.
हेही वाचा: फिरकीच्या जादुगाराचा फलंदाजीत आहे विश्वविक्रम; माहितीय का?
2008 च्या आयपीएल हंगामातील इतर सात संघाच्या तुलनेत राजस्थानचा संघाला फार डिमांड नव्हते. शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वाचा योग्यरितीने वापर करुन संघाला फायनलपर्यंत पोहचवले. कोणत्या-खेळाडूचा वापर कसा करायचा याची झलक त्याने आयपीएलमध्ये दाखवून दिली. ऑस्ट्रेलियन दिग्गजाने फायनलमध्येही हातून निसटलेला सामना रणनितीच्या जोरावर जिंकत राजस्थान संघाला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून दिली होती.
Web Title: Ipl Rajashan Royals Shane Warne On Munaf Patels Age
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..