आयपीएलला होणार 23 मार्चपासून सुरवात

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे, की 23 मार्च 2019 पासून आयपीएलचा हंगाम सुरु होईल. या प्रकरणी संबंधिक प्रशासकांशी चर्चा केली जाईल. आयपीएलचे वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत लवकरच प्रशासकीय समितीशी चर्चा करण्यात येईल.

नवी दिल्ली : जगातिल सर्वांत प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी यंदा 23 मार्चचा मुहूर्त मिळाला असून, सर्व सामने भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बीसीसीआयने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आयपीएलच्या 12 मोसमाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीसोबत आयपीएलच्या कोअर समितीची चर्चा झाली. यानंतर ही स्पर्धा भारतातच होणार हे स्पष्ट करण्यात आले. भारतात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असून, आयपीएलच्या तारखांबाबत साशंकता होता. पण, आता एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयपीएलचा हंगाम सुरु होण्याची तारिख जाहीर करण्यात आली आहे.

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे, की 23 मार्च 2019 पासून आयपीएलचा हंगाम सुरु होईल. या प्रकरणी संबंधिक प्रशासकांशी चर्चा केली जाईल. आयपीएलचे वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत लवकरच प्रशासकीय समितीशी चर्चा करण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL to start from 23rd march

टॅग्स