IPL 2023 : पंजाब किंग्जमध्येही बदलाचे वारे; हेड कोच कुंबळेच्या डोक्यावर लटकती तलवार

पंजाब किंग्जच्या संघाला आजपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही.
Anil Kumble Punjab Kings
Anil Kumble Punjab Kings

Punjab Kings Anil Kumble : आयपीएलमध्ये टीम पंजाब किंग्स आता नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा करार संपत अशा परिस्थितीत फ्रँचायझी त्यांच्यासोबत करार पुढे न करण्याची नसल्याची बातमी येत आहे. अलीकडेच कोलकाता नाइट रायडर्सने ब्रेंडन मॅक्क्युलमच्या जागी चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता प्रीती झिंटाची टीम पंजाब किंग्स सुद्धा मोठा बदल करताना दिसू शकते.

Anil Kumble Punjab Kings
IND vs ZIM : भर मैदानात इशान किशनवर 'हल्ला', युवा फलंदाज बचावला - Video

पंजाब किंग्जच्या संघाला आजपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. इतकंच नाही तर 2014 च्या आयपीएलपासून हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचलेला नाही. आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्जचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेते म्हणून संपला, ही त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Anil Kumble Punjab Kings
Asia Cup 2022 : रोहित अँड कंपनीची आधी 'फिटनेस टेस्ट' नंतर दुबईला रवाना

एका सूत्राने सांगितले की, पंजाब किंग्सने अनिल कुंबळेसोबतचा तीन वर्षांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराची मुदत या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे. फ्रँचायझीने आधीच नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. फ्राँचायझीने ओएन मॉर्गन, ट्रेवर बेलिस आणि माजी भारतीय प्रशिक्षक यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते. शेवटी यापैकी एकाची या पदावर नियुक्ती होऊ शकते. पंजाब किंग्जच्या अधिकाऱ्यांनी पुढील एक-दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

Anil Kumble Punjab Kings
India Vs Pakistan : 'इंदिरा नगर का गुंडा' द्रविड जेव्हा शोएबच्या अंगावर धावून गेला होता

अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली पंजाब संघाने 42 पैकी केवळ 19 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात पंजाब फ्रँचायझीमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि कागिसो रबाडा या खेळाडूंचा समावेश होता. पण तरीही संघ 14 पैकी केवळ 7 सामने जिंकू शकला आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com