IND vs ZIM : भर मैदानात इशान किशनवर 'हल्ला', युवा फलंदाज बचावला - Video

IND vs ZIM : राष्ट्रगीतादरम्यान मधमाशीने ईशान किशनच्या कानात वाजवला बँड
ishan kishan
ishan kishan

Ishan Kishan IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. भारताने हा सामना एकतर्फी 10 गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया वनडे मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. राहुलने कर्णधार म्हणून छाप पाडली, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. राष्ट्रगीतादरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर मधमाशीने हल्ला केला, ज्यानंतर त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Ishan Kishan During National Anthem Bee Attack Reaction Viral)

ishan kishan during national anthem bee attack reaction viral
ishan kishan during national anthem bee attack reaction viral
ishan kishan
एका ट्विटने क्रिकेटरच्या आयुष्यात आणले घटस्फोटाचे वादळ, पण....

इशान किशन राष्ट्रगीतामध्ये पूर्णपणे मग्न होता, तेव्हा एक मधमाशी त्याच्या कानाजवळ आली आणि त्याला धक्काच बसला. इशान किशन मधमाशी पाहून अस्वस्थ झाला आणि त्याला धक्काच बसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ishan kishan
Asia Cup 2022 : रोहित अँड कंपनीची आधी 'फिटनेस टेस्ट' नंतर दुबईला रवाना

सामनाबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या, पण पहिला विकेट पडताच संपूर्ण संघ कोलमडला. झिम्बाब्वेचे चार फलंदाज 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर सिकंदर रझा आणि कर्णधार चकाबवा यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 35 धावा जोडल्या, पण फेमसने रझाला बाद करून ही भागीदारी तोडली.

110 धावांवर झिम्बाब्वेने आठ विकेट गमावल्या होत्या, परंतु यानंतर इव्हान्स आणि नागरवा यांच्यातील शानदार 70 धावांची भागीदारी झाली आणि झिम्बाब्वेचा संघ अखेरीस 189 धावा करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 30.5 षटकांत लक्ष्य गाठले. शिखर धवन 81 आणि शुभमन गिल 82 धावा करून नाबाद परतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com