SRH vs CSK : डोकेबाज गोलंदाज आहे कर्णधार! हैदराबादनं मुंबईनंतर आता चेन्नईचा देखील माज उतरवला

SRH Defeat CSK IPL 2024
SRH Defeat CSK IPL 2024 esakal

SRH vs CSK : मुंबई इंडियन्सविरूद्ध 277 धावा ठोकणारी हैदराबाद आज सीएसकेविरूद्ध खेळणार होती. मैदान देखील 277 धावा झालेलंच होतं. त्यामुळं आज जाळ अन् धूर संगटच अशी काहीशी अपेक्षा चाहत्यांची होती. मात्र पॅट कमिन्सच्या हैदराबादनं चेन्नईवर निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना अगदी 'सामन्य' करून टाकला!

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हैदराबादनं टिच्चून मारा करत सीएसकेची पॉवर प्लेमध्येच हवा काढून घेतली. गोलंदाज कर्णधार असल्यावर संघाचा गोलंदाजी विभाग तगडा होणारच! कमिन्सनं देखील हैदराबादची गोलंदाजी स्ट्राँग केली होती. या गोलंदाजीनं सांघिक कामगिरी करत सीएसकेच्या मुसक्या आवळल्या.

SRH Defeat CSK IPL 2024
SRH vs CSK IPL 2024 : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

पॉवर प्लेमध्येच धावांचा दुष्काळ पडल्यानंतर शिवम दुबे नावांची एक मोठी सर कोसळली. मात्र हैदराबादनं लगेचच बांध घालत हे पाणी आपल्या वावरात घुसू दिलं नाही. 13 षटकात 115 धावा करणाऱ्या सीएसकेला हैदराबादनं 165 धावात रोखलं. यावरून हैदराबादनं कशी गोलंदाजी केली असेल याचा अंदाज येतो. चेन्नईचा थला धोनी फलंदाजीला आला... चाहत्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं मात्र शेवटच्या दोन चेंडूत तो देखील काय करणार होता बापडा!

चेन्नई 165 धावात अडकल्यावर असं वाटलं की खेळपट्टीत काहीतरी आहे. सीएसकेची पोरं देखील हैदराबादच्या नाकात दम करतील. मात्र झालं उलटं! ट्रॅविस हेड अन् अभिषेक शर्मानं अवघ्या 3 षटकात 46 धावा चोपल्या अन् सामना तिथंच सीएसकेच्या हातून निसटला.

अभिषेक शर्मानं तर 12 चेंडूत 37 धावा ठोकत यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानं सामन्याची दिशाच बदलून टाकली. यानंतर हेडनं देखील 31 धावांच योगदान दिलं. त्यानं माक्ररमच्या साथीनं हैदराबादचं नवव्या षटकातच शतक पार पोहचवलं.

SRH Defeat CSK IPL 2024
Kuldeep Yadav MI vs DC : मुंबईविरूद्धच्या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का; विकेट टेकर गोलंदाज बसणार बेंचवर?

अभिषेकनं घालून दिलेल्या भक्कम पायावर माक्ररमनं 36 चेंडूत 50 धावा ठोकत विजयाचा कळस रचण्याचा प्रयत्न केला. मात्र मोईन अलीनं त्याला बाद करत हैदराबादचं टेन्शन वाढवलं. पाठोपाठ शाहबाज अहमद देखील स्वस्तात माघारी परतला. मात्र मोईन अली हे सीएसकेचं पेल्यातलं वादळ ठरलं. क्लासेन अन् नितीश रेड्डीनं हैदराबादच्या विजयाची औपचारिकता 19 व्या षटकात पूर्ण केली.

हैदराबादनं ज्या प्रकारे सांघिक कामगिरी करत चेन्नईचा पराभव केला ते पाहता हैदराबाद यंदाच्या हंगामात काहीतरी तुफानी करणार असं वाटतंय. बर सीएसकेबाबत बोलायचं झालं तर सीएसकेला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात मिळाली नाही. अन् त्यांची गाडी अडकली!

मधल्या षटकात त्यांनी पुन्हा गिअर बदलला खरा मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी शेवटच्या 7 षटकात सीएसकेला फक्त 50 धावा करू दिल्या. यंदाच्या हंगामात हैदराबादनं आधी मुंबईचा अन् आता चेन्नईचा माज उतरवला. मुंबईविरूद्ध फलंदाजांनी मोहीम फत्ते केली तर गोलंदाजांनी चेन्नईची पळता भुई थोडी केली.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com