RR vs CSK : संजूच्या राजस्थानने धोनीच्या चेन्नईचे हिसकावले अव्वल स्थान, दिली 32 धावांनी मात

Rajasthan Royals vs Chennai Super Kings
Rajasthan Royals vs Chennai Super Kingsesakal

Rajasthan Royals vs Chennai Super Kings : राजस्थानने ठेवलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडूनऋतुराज गायकवाड (47) आणि शिवम दुंबे (33 चेंडूत 52 धावा) यांनी झुंजार फलंदाजी केली. मात्र सीएसकेला 20 षटकात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. राजस्थानकडून अॅडम झाम्पाने 3 तर रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. फलंदाजीत यशस्वी जैसवालने धडाकेबाज फलंदाजी करत 77 धावा ठोकल्या होत्या.

Rajasthan Royals vs Chennai Super Kings
RR vs CSK Yashasvi Jaiswal : @202! राजस्थानने सवाई मानसिंगवर कधी घडलं नाही ते करून दाखवलं

राजस्थानने ठेवलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला म्हणावी तशी आक्रमक सुरूवात करता आली नाही. संथ सुरूवातीनंतर ऋतुराज गायकवाडने डाव सावरत आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही. कॉन्वेने 16 चेंडूत 8 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे 13 चेंडूत 15 धावा करून बाद झाला.

यानंतर शिवम दुबेने षटकार आणि चौकारांची बरसात करून राजस्थानचे टेन्शन वाढवले होते. त्याला मोईन अली (23) आणि रविंद्र जडेजा (23) चांगली साथ देत होते. मात्र राजस्थानच्या धावांच्या डोंगरापुढे आणि फिरकीच्या रणनितीपुढे दुबेचे प्रयत्न खुजे पडले. अखेर राजस्थानने चेन्नईला 20 षटकात 6 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. शिवम दुबेने 33 चेंडूत 52 धावा केल्या.

Rajasthan Royals vs Chennai Super Kings
RCB Fans Girl With Banner : ही पोरगी आरसीबी IPL जिंकल्याशिवाय काही शाळेला जात नाही

राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर कोणालाही 200 धावाचा टप्पा पार करता आला नव्हता तो आज राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. यशस्वीनंतर ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला 202 धावा करण्यात मोठा हातभार लावला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com