
Ajinkya Rahane praises Moeen Ali: सुनील नरेनला दुखापत झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी अखेरच्या क्षणी निवड झालेल्या मोईन अलीने लगेचच जम बसवला आणि गोलंदाजीत केलेल्या प्रभावी कामगिरीचे कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कौतुक केले.
गुवाहाटीतील फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मोईने अलीने २३ धावांत दोन विकेट अशी कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीनेही १७ धावांत दोन विकेट मिळवल्यामुळे कोलकाता संघाने राजस्थानला नऊ बाद १५१ धावांत रोखले आणि हे आव्हान १७.३ षटकांत पार करून यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला.