KKR च्या विजयानंतरही रहाणे वाईटरित्या ट्रोल; IPL करियर संपुष्टात? | Ajinkya Rahane Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Rahane Trolled After Slow Knock Against Mumbai Indians

KKR च्या विजयानंतरही रहाणे वाईटरित्या ट्रोल; IPL करियर संपुष्टात?

Ajinkya Rahane IPL 2022: आयपीएलच्या कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 52 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवली आहे. केकेआरचा संघ या सामन्यात पाच बदलांसह मैदानात उतरला होता. हे बदल श्रेयस अय्यरच्या संघासाठीही प्रभावी ठरले. या सामन्यात KKR कडून सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणेने 24 चेंडूत 25 धावा केल्या मात्र त्याची संथ खेळी चाहत्यांना अजिबात आवडली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवतली जात आहे. रहाणेने 25 धावांच्या खेळीत तीन चौकार मारले पण या वेळात त्याला लय आली नाही. रहाणे कासवासारखा चालत होता पण दुसऱ्या टोकावरून बाकीचे फलंदाज आक्रमक खेळत होते. त्यामुळेच KKR चा रन रेट कमी झाला नाही पण रहाणेची ही खेळी त्याच्या ट्रोलिंगचे कारण बनली आहे. (Ajinkya Rahane Trolled After Slow Knock Against Mumbai Indians)

रहाणेला या हंगामाच्या सुरुवातीला काही सामने खेळला होता. त्यानंतर संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास उडाला आणि तो परत बेंच वर दिसला. मात्र जेव्हा तो मुंबईविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा त्याने संथ खेळी केली आणि चाहते त्याला मीम्स बनवून ट्रोल करत आहेत.

अजिंक्य रहाणेला आधीच टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. काही काळा पासून खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला निवड समितीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल ही शेवटची आशा होती, मात्र आता या फलंदाजाचे पुनरागमन जवळपास अशक्य आहे. अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली आहे.

Web Title: Ajinkya Rahane Trolled After Slow Knock Against Mumbai Indians Mi Vs Kkr Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top