रसेल शून्यावर बाद थेट चिकन डिनरला! चाहत्यांकडून खिल्ली

शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलला चिकन डिनर पाहून सोशल मीडियावर उडवल्या जात आहे खिल्ली
Andre Russell Chicken Dinner Viral Photo
Andre Russell Chicken Dinner Viral Photosakal

IPL 2022: आयपीएलच्या 41 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेला. दिल्ली कॅपिटल्सने (DC) कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 4 विकेट्सने पराभव केला. कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध धमाकेदार कामगिरी करणार अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु तो या अपेक्षांवर पूर्णपणे अपयशी ठरला. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे. कालच्या खराब कामगिरीसह रसेल आणखी एका गोष्टीसाठी वाईटरित्या ट्रोल केलं जात आहे.(Andre Russell Chicken Dinner Viral Photo)

KKR चा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल शून्यावर बाद होताच थेट डिनर करायला गेला. आंद्रे रसेल डिनर करताना टीव्ही कॅमेऱ्यात पाहिला मिळाला. त्यानंतर त्याचा डिनर करतानाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेल 3 चेंडूं खेळत शून्यावर बाद झाला. आंद्रे रसेलला शून्यावर बाद झाल्यानंतर डिनर करताना पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली सुरवात केले.

आंद्रे रसेलची आयपीएल 2022 मधील कामगिरी काही खास राहिली नाही. आंद्रे रसेलने IPL 2022 च्या नऊ सामन्यांमध्ये केवळ 227 धावा केल्या आहेत. आंद्रे रसेल गेल्या 10 हंगामात आयपीएल खेळत आहे आणि त्याने 30.11 च्या सरासरीने आणि 178.26 च्या स्ट्राइक रेटने 1927 धावा केल्या आहेत. आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये ८२ विकेट घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com