आंद्रे रसेलचा झंजावात रोखत गुजरातचा विजयी 'षटकार'

Andre Russell Resistance but Gujarat Titans Defeat Kolkata Knight Riders
Andre Russell Resistance but Gujarat Titans Defeat Kolkata Knight Riders esakal

मुंबई : आंद्रे रसेलने (Andre Russell) गोलंदाजीत शेवटच्या ओव्हरमध्ये धमाका केला होता. मात्र फलंदाजीत तो शेवटच्या षटकात धमाका करण्यात चुकला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 8 धावांनी पराभव करत आपला सहावा विजय साजरा करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गुजरातने केकेआर समोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र केकेआरला 20 षटकात 8 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक 67 तर केकेआरकडून आंद्रे रसेलने 48 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत गुजरातकडून शामी, राशिद आणि दयालने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Andre Russell Resistance but Gujarat Titans Defeat Kolkata Knight Riders
KKR vs GT : रसेल एकटाच भिडला मात्र शेवटच्या षटकात GT ची विजयी मोहर

गुजरात टायटन्सच्या 157 धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात देखील खराब झाली. मोहम्मद शामीने सॅम बिलिंग्ज (4) आणि सुनिल नारायण (5) यांना पाठोपाठ बाद केले. त्यानंतर लॉकी फर्ग्युसने नितीश राणाला (2) बाद करत अजून एक धक्का दिला. त्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी असलेल्या श्रेयस अय्यरनेही निराशा केली. त्याला यस दयालने 12 धावांवर बाद केले.

केकेआरचे 34 धावांवर 4 फलंदाज माघारी गेल्यानंतर रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यश दयालने 35 धावा करणाऱ्या रिंकूला बाद करत मोठा धक्का दिला. त्या पाठोपाठ राशिद खानने व्यंकटेश अय्यर (17) आणि शिवम मावी (2) यांना बाद करत केकेआरची अवस्था 7 बाद 108 धावा अशी केली.

मात्र, गोलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या आंद्रे रसेलने केकेआरला अवघड परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कंबर कसली. त्याने उमेश यादवला साथीला घेत भागीदारी रचली. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रसेलने सामना 6 चेंडूत 18 धावा असा आणला. त्याने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सामना 5 चेंडूत 12 धावा असा आणला. मात्र जोसेफने त्याला दुसऱ्याच चेंडूवर बाद करत पारडे गुजरातकडे झुकवले. रसेलने 25 चेंडूत 48 धावांची खेळी केली.

Andre Russell Resistance but Gujarat Titans Defeat Kolkata Knight Riders
रसेलचा 'रशगुल्ला' परफॉर्मन्स; 'एक'ही मारा पण सॉलिड मारा!

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. सर्व संघ नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतात मात्र हार्दिक पांड्याने फलंदाजी घेतली. त्याचा हा निर्णय त्यानेच फलंदाजीत योग्य ठरवून दाखवला. शुभमन गिल (7) स्वस्तात माघारी गेल्यानंतर हार्दिकने वृद्धीमान साहा सोबत 75 धावांची भागीदारी रचली. मात्र साहाने 25 धावा करून हार्दिकची साथ सोडली.

मात्र हार्दिकने डेव्हिड मिलरसोबत (27) भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हार्दिकने हंगामातील सलग तिसरे अर्धशतक ठोकले. मात्र ही जोडी शिवम मावीने तोडली. यानंतर गुजराच्या गळतीला सुरूवात झाली. टीम साऊदीने पांड्याला 67 धावांवर बाद केले. पाठोपठा साऊदीने राशिद खानला देखील भोपळाही न फोडता माघारी धाडले.

यानंतर गुजरातला शेवटच्या पाच षटकामध्ये धावा करण्याच यश आले नाही. शेवटचे षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलने कमालच केली. त्याने शेवटच्या षटकात फक्त 5 धावा देत तब्बल 4 विकेट घेतल्या. रसेलची हे सान्यातील पहिलेच षटक होते. केकेआरकडून टीम साऊदीने देखील चांगला मारा करत 24 धावात 3 विकेट घेतल्या. या जोरावर केकेआरने गुजरातला 20 षटकात 9 बाद 156 धावांवर रोखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com