Axar Patel: दिल्ली कॅपिटल्स कर्णधार अक्षर पटेल म्हणतो: ‘हा नियम मला पटत नाही, अष्टपैलूंचा मोल कमी’
IPL Impact Player Rule: दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार आणि भारताचे टी-२० उपकर्णधार अक्षर पटेल यांनी IPL इम्पॅक्ट खेळाडू नियमावर नाराजी व्यक्त केली. अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे म्हणत त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सक्षमता नसल्याशिवाय अंतिम संघात निवड कठीण असल्याचे स्पष्ट केले.
नवी दिल्ली : आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आपल्याला आवडलेला नाही, असे थेट आणि स्पष्ट शब्दात अष्टपैलू अक्षर पटेलने स्वतःचे मत व्यक्त केले. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होत आहे, असेही तो म्हणाला.