IPL सुरू असताना BCCIची मोठी घोषणा! भारतीय क्रिकेटचे 2023-24 या वर्षासाठी वेळापत्रक जाहीर

पुढल्या वर्षी 70 दिवस रंगणार क्रिकेटचा मोठा थरार
India Domestic Cricket Schedule
India Domestic Cricket Schedule

India Domestic Cricket Schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळल्या गेले आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2023-24 या वर्षासाठी भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतीय क्रिकेटच्या 2023-24 च्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होईल. त्याच वेळी सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी 2024 च्या सुरुवातीला खेळली जाईल.

India Domestic Cricket Schedule
IPL 2023 : "हे सगळं फेक!" रोहितबद्दल पसरलेल्या अफवेवरून CSKच्या तुषार देशपांडेचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेटचा 2023-24 देशांतर्गत हंगाम 28 जूनपासून दुलीप करंडक स्पर्धेने सुरू होईल तर रणजी करंडक पुढील वर्षी 5 जानेवारीपासून होणार आहे. यादरम्यान सहा प्रादेशिक संघांमध्ये दुलीप करंडक खेळला जाईल. यानंतर देवधर करंडक यादी अ स्पर्धा (24 जुलै-3 ऑगस्ट), इराणी चषक (1-5ऑक्टोबर), सय्यद मुश्ताक अली करंडक पुरुष टी-20 राष्ट्रीय अजिंक्यपद (16 ऑक्टोबर-6 नोव्हेंबर) आणि विजय हजारे एकदिवसीय ट्रॉफी (23नोव्हेंबर-15 डिसेंबर) आयोजित केली जाईल.

India Domestic Cricket Schedule
IPL 2023: मराठमोळ्या ऋतुराजकडून गब्बरनं हिसकावली ऑरेंज कॅप, पाहा शर्यतीत असलेले टॉप 5 क्रिकेटर

रणजी करंडक ही या मोसमातील पुरुष वरिष्ठ गटातील शेवटची स्पर्धा असेल. त्याच्या एलिट गटातील साखळी टप्प्यातील सामने 5 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील तर बाद फेरीचे सामने 23 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होतील. ही स्पर्धा 70 दिवस चालणार आहे. प्लेट गटाचे साखळी सामने 5 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान तर बाद फेरीचे सामने 9 ते 22 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील.

एलिट गटात, चार गटांमध्ये आठ संघ असतील, त्यापैकी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट गटातील सहा पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट ग्रुपच्या अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ आगामी हंगामात (2024-25) एलिट गटात सामील होतील. एलिट गटातील एकूण 32 संघांच्या सारणीतील शेवटचे दोन संघ प्लेट गटात सोडले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com