IPL 2023 BCCI Seniors Rest : आयपीएलचा झेलला 'असह्य' ताण; आता पुन्हा सुरू होणार स्टार्सचा विश्रांतीचा काळ

IPL 2023 BCCI Seniors Player Rest
IPL 2023 BCCI Seniors Player Restesakal

IPL 2023 BCCI Seniors Player Rest : आयपीएलचा 74 सामन्यांचा थकवणारा 16 वा हंगाम लवकरच संपणार आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू हा संपूर्ण हंगाम खेळले आहेत. तसेच आयपीएलनंतर लगेचच WTC ची फायनल खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघातील खेळाडू एक एक करून लंडनला रवाना होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान सोबतची मालिका रद्द होते का अशी चर्चा सुरू झाली आहे.

मात्र बीसीसीआय भारतात अफगाणिस्तानसोबत होणारी ही मालिका रद्द करण्याऐवजी या मालिकेत आपला दुय्यम संघ उतरवण्याची शक्यता आहे. या मालिकेत भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह सर्वच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.

IPL 2023 BCCI Seniors Player Rest
Suryakumar Yadav : सूर्याने अहमदाबादला जाता जाता केला 'लिंबू प्रँक', तिलक वर्माची अवस्था तर...

अफगाणिस्तानविरूद्धची मालिका ही 20 ते 30 जून दरम्यान खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआय ही मालिका अजून शॉर्ट करू शकते. किंवा या मालिकेत फक्त टी 20 किंवा वनडे मालिकाच खेळवली जाऊ शकते. या मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा दुय्यम संघ खेळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडीज विरूद्धच्या फुल फ्लेज मालिकेपूर्वी विश्रांती देण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. भारतीय संघ 12 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

IPL 2023 BCCI Seniors Player Rest
IPL 2023 : करोडपतींवर भारी पडले 'लाख'मोलाचे खेळाडू; खिसा रिकामा तरी कामगिरीचं नाणं खणखणीत वाजवलं!

यानंतर संघ तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आयर्लंडला जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर आयपीएल हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात आशिया कप डोळ्यासमोर ठेवून हार्दिक पांड्याला देखील विश्रांती देण्यात येईल.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com