Women's IPL बाबत होणार 'चर्चा'; पाकने बाजी मारल्यानंतर BCCIला आली जाग

BCCI Will discuss Women's IPL feasibility
BCCI Will discuss Women's IPL feasibility esakal

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने महिला IPL स्पर्धा (Women's IPL) सुरू चाचपणी करण्यात येणार आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शहा (Jay Shah) यांनी महिलांची आयपीएल सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली होती.

दरम्यान, बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, 'महिला आयपीएल बाबतची चर्चा गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर याबाबत अॅक्शन प्लॅन तयार केला जाईल.'

BCCI Will discuss Women's IPL feasibility
Video : शाब्बास! बोल्ड झाल्यावर वॉर्नरनं थोपटली अफ्रिदीची पाठ

महिला आयपीएल आयोजित करताना किती संघ घ्याचे आणि विदेशी महिला खेळाडूंच्या सहभाग किती ठेवायचा याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत बीसीसीआय टेंडर प्रोसेस आणि आयपीएलच्या 2023 ते 2027 पर्यंतच्या मीडिया राईट्सबाबतही चर्चा करणार आहे.

BCCI Will discuss Women's IPL feasibility
VIDEO: सीएसकेचा कॅप्टन झाल्यानंतर रविंद्र जडेजा काय म्हणाला?

सध्या जगभरात दोन महिला टी 20 लीग स्पर्धा सुरू आहेत. ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (Big Bash League) आणि इंग्लंडमध्ये 'वुमन हंड्रेड' स्पर्धांचे आयोजन होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी महिला पाकिस्तान सुपर लीग (Women's PSL) आयोजित करायला परवानगी दिली होती. त्यावेळी भारताआधी पाकिस्तानने महिला टी 20 स्पर्धा आयोजित करण्यात बाजी मारली अशी चर्चा सुरू झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com