स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार होताच प्रशिक्षक पदासाठी GT च्या मेटॉरचे नाव चर्चेत | Ben Stokes England New Test Captain Gujarat Titans Mentor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes England New Test Captain Gujarat Titans Mentor Gary Kirsten

स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार होताच प्रशिक्षक पदासाठी GT च्या मेटॉरचे नाव चर्चेत

नवी दिल्ली : बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार (England Test Team Captain) होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. इंग्लंडची आघाडीची वेबसाईट डेली मेलने बेन स्टोक्स कसोटी कर्णधार होण्यासाठी सहमती दर्शवली असल्याचे सांगितले. लवकरच इंग्लंड क्रिकेट बोर्ड याची अधिकृत घोषणा करणार आहे. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजमधील मालिका गमावल्यानंतर जो रूटने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच स्टोक्स इंग्लंडचा भावी कसोटी कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान आता स्टोक्सच्या नावावर शिक्कामोर्तब होत असतानाच संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून गुजरात टायटन्सचे मेंटॉर (Gujarat Titans Mentor) गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: शास्त्रींची भविष्यवाणी; 'हा' गोलंदाज दिसणार भारतीय टी 20 संघात

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गॅरी कर्स्टन यांनी ते या रोलसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. यंदाचा आयपीएल हंगाम झाल्यानंतर गॅरी कर्स्टन गुजरात टायटन्सचा करार मोडण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या प्रशिक्षक पदासाठी ओटिस गिब्सन, सामयन कॅटिच यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. मात्र या नावात सर्वात आघाडीवर गॅरी कर्स्टन यांचे नाव आहे. त्यांचीच कसोटी आणि मर्यादित षटकांच्या इंग्लंड संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते. दरम्यान, बेन स्टोक्सने रॉब की यांच्या बरोबर झालेल्या भेटीवेळी कार्यकारी संचालकांकडे त्वरित स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला संघात घेण्याची मागणी केली आहे. भावी कर्णधाराने दोन्ही खेळाडूंना पुनरागमनाचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा: 'विराट अजून 6-7 वर्षे खेळायचं असेल तर IPL मधून बाहेर पड'

Web Title: Ben Stokes England New Test Captain Gujarat Titans Mentor Gary Kirsten May Appoint Coach

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top