Cameron Green MI vs SRH : अखेर 17.50 कोटीच्या खेळाडूने दाखवला आपला शतकी दम, पावसात भिजणाऱ्या आरसीबीची बसली पाचावर धारण

Cameron Green 1st IPL Century MI vs SRH
Cameron Green 1st IPL Century MI vs SRHesakal

Cameron Green 1st IPL Century MI vs SRH : मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्स आणि 12 चेंडू राखून पराभव करत आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवले. मुंबईकडून महागड्या कॅमरून ग्रीनने आपले टी 20 मधील पहिले वहिले शतक ठोकत हा विजय साकारला. ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकले. त्याने विजयासाठी आणि त्याच्या शतकासाठी 1 धावेची गरज असताना चौकार मारला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 56 धावांची अर्धशतकी खेळी करत ग्रीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 124 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली.

मुंबईच्या या विजयामुळे त्यांचे 14 सामन्यात 8 विजयांसह 16 गुण झाले आहेत. मात्र त्यांचे नेट रनरेट हे -0.044 इतके आहे. त्यामुळे त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी आरसीबी आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यात काय होते याकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला आहे. जर हा सामना वॉश आऊट झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. या परिस्थितीत मुंबई इंडियन्स थेट प्ले ऑफ गाठेल. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर ते 16 गुणांसह सरस रनरेटममुळे प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील.

Cameron Green 1st IPL Century MI vs SRH
Rohit Sharma MI vs SRH : रोहित शर्माने ठेवले विराटच्या पावलावर पाऊल, केला मोठा माईलस्टोन पार!

सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली. इशान किशन 14 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनने पहिल्यापासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा सावध फलंदाजी करत भागीदारी वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला.

या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 60 धावा ठोकल्या. पॉवर प्लेनंतर रोहितनेही आपला गिअर बदलला. दरम्यान, कॅमरून ग्रीनने आपले अर्धशतक 20 चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी नवव्या षटकातच मुंबईला शंभरी पार करून दिली. या दोघांनी आपली भागीदारी शतकी केली. रोहितनेही अर्धशतक पूर्ण केले.

Cameron Green 1st IPL Century MI vs SRH
Anushka Sharma RCB vs GT : अनुष्काने इन्स्टावर स्टोरी ठेवत भीती केली व्यक्त...

मुंबई इंडियन्सने सामन्यावर आपली पकड मजबूत केली असे वाटत असतानाच दागरने रोहित शर्माला 56 धावांवर बाद करत ग्रीन आणि रोहितची 124 धावांची भागीदारी तोडली. यानंतर ग्रीनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने सूर्यकुमारसोबत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 17 व्या षटकातच 190 धावांच्या पार पोहचवले. याचबरोबर ग्रीन आपल्या शतकाजवळ पोहचला होता. त्याने भुवनेश्वर कुमारला त्याने चौकार मारत मुंबईचा विजय आणि स्वतःचे पहिले आयपीएल शतक साकारले.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com