IPL 2022 : सीएसकेच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकमागे ग्राऊंड स्टाफ 'केमिकल लोचा'

Chennai Super Kings 3rd Defeat Reason
Chennai Super Kings 3rd Defeat Reason esakal

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) कधी नव्हे ते हंगामाच्या सुरुवातीलाच सलग तीन पराभव सहन केले. गेल्या सामन्यात सीएसकेला पंजाब किंग्जने (Punjab Kings) पराभवाची धूळ चारली. त्यांनी सीएसकेचा तब्बल 54 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचे पहिले दोन पराभव हे पहिल्यांदा बॅटिंग करताना झाले होते. मात्र तिसऱ्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून चेस करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर बॅटिंग करताना दव (Dew Factor) पडल्यानंतर त्याचा फायदा होईल असा सीएसकेचा होरा होता. मात्र सामन्याचा निकाल सीएसकेच्या विरूद्ध गेला.

पंजाब विरूद्धच्या सामन्यात दव फॅक्टर हा दिसलाच नाही. याला ब्रेबॉर्न स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफची (Groundmen) एक युक्ती कारणीभूत होती. सीएसके आणि पंजाब सामन्यापूर्वी मैदानावरील हिरवळीवर दवबिंदू तयार होऊ नयेत म्हणून ग्राऊंड स्टाफने दवबिंदू रोधी औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसपा 80 (Apsa 80) या रासायनिक द्रव्याचा वापर केला. विशेष म्हणजे ग्राऊंड स्टाफची ही युक्ती या सामन्यात कामी आली. त्यामुळे दुसऱ्या डावात पंजाबच्या गोलदाजांना चेंडूवरील आपली पकड मजबूत ठेवण्यात यश आले. याचा तोटा मात्र सीएसकेला झाला. त्यांचा दवाचा अंदाज चुकला आणि त्यांना हंगामातील सलग तिसऱ्या पराभवला सामोरे जावे लागले.

याबाबत चेन्नईच्या फॅन्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. ग्राऊंड स्टाफने ही शक्कल लखनौ सुपर जायंट विरूद्धच्या सामन्यात का लढवली नाही असा प्रश्न चाहते विचारत आहेत. लखनौ सुपर जायंटच्या सामन्यावेळी चेन्नईला 210 धावांचे आव्हान देखील डिफेंड करता आले नव्हते. त्या सामन्यात दवामुळे सीएसकेच्या फिरकीपटूंना चेंडू ग्रीप करता येत नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com