
मिल्नेने IPL सोडली; CSK ने 'छोटा मलिंगा'ला केले पाचारण
नवी दिल्ली : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामात सध्या तरी चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) अवस्था फारशी चांगली नाही. त्यांना आतापर्यंत फक्त 6 सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. चेन्नईला हंगाम सुरू होण्यापूर्वीच दुखापतीचा फटका बसला होता. त्यांचा सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकला आहे. आता अॅडम मिल्ने (Adam Milne) देखील आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी चेन्नईने रिप्लेसमेंट म्हणून श्रीलंकेच्या मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) याला संघात सामील करून घेतले आहे.
हेही वाचा: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरच्या यादीत
केकेआरच्या सामन्याविरूद्ध अॅडम मिल्नेला दुखापत झाली होती. आता संघ व्यवस्थापनाने मिल्ने उर्वरित आयपीएल हंगामाला मुकणार असल्याचे स्पष्ट केले. चेन्नईने मिल्नेची रिप्लेसमेंट म्हणून मथीशा पाथिराना याचा संघात समावेश केला आहे. मथिराना हा फक्त 19 वर्षाचा असून त्याची बॉलिंग अॅक्शन ही लसिथ मलिंगा सारखी आहे. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. पथिरानाला चेन्नईने त्याची बेस प्राईस 20 लाख रूपयाला विकत घेतले आहे. पथिरानाला छोटा मलिंगा या टोपण नावानेही ओळखले जाते.
हेही वाचा: IPL 2022: कोरोनाची अशीही भीती; ड्रेसिंग रुममध्ये मास्कचं पुनरागमन
चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाच्या हंगामात कोणतीच गोष्ट योग्य होत नाहये. त्यांना सहा सामन्यात 5 पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच त्यांचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर दुखापतीमुळे अर्धा आयपीएल हंगाम खेळणार नव्हता. मात्र त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याने तो सीएसकेसाठी संपूर्ण हंगाम उपलब्ध होऊ शकणार नाही. हा धक्का सीएसके पचवते तोपर्यंत अॅडम मिल्ने देखील दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे.
Web Title: Chennai Super Kings Junior Malinga Matheesha Pathirana Replaced For Injured Adam Milne
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..