निवृत्तीचे ट्विट डिलीट करणाऱ्या रायडूवर CSK च्या CEO ने दिले स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

csk ceo kasi viswanathan clarifies after ambati rayudu deletes tweet will be my last ipl

निवृत्तीचे ट्विट डिलीट करणाऱ्या रायडूवर CSK च्या CEO ने दिले स्पष्टीकरण

अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रायडूच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज फलंदाजाचे ट्विट दुपारी 12:46 वाजता आले होते परंतु जवळपास एक तासानंतर ते ट्विट डिलीट केले. 36 वर्षीय रायुडूचे शेवटची आयपीएल आहे की नाही याबद्दल एक मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे की रायडू "निवृत्त होत नाही."(csk ceo kasi viswanathan clarifies after ambati rayudu deletes tweet will be my last ipl)

अंबाती रायडूने शनिवारी दुपारी 12.46 ला निवृत्तीचे ट्विट केले. आणि ते काही तासांतच ते डिलीट केले. त्याच्या या गोंधळानंतर सीएकेचे सीईओने स्पष्टीकरण दिले आहे. रायडू सन्यास घेत नसल्याचे सीईओने म्हटले आहे. नाही नाही तो निवृत्त होणार नाही.

कदाचित तो त्याच्या प्रदर्शनावर खूश नसेल त्यामुळे त्याच्या हातून असे काहीसे घडले असेल असे सीएसकेच्या सीईओने म्हटले आहे. तो नेहमीच आमच्यासोबत राहणार आहे असे सांगत रायडू आगामी सीझनमध्येही खेळणार असल्याचे स्पष्ट केले.

अंबाती रायुडूने निवृत्तीची माहिती ट्विट करत दिली. त्याने 12. 46 निवृत्तीचे ट्विट केले आणि ते काही तासातच डिलीट केले.

काय म्हटले होते ट्विटमध्ये?

मी जाहिर करत आहे की ही माझी अखेरची आयपीएल असेल. गेली 13 वर्ष मी आयपीएलमध्ये खेळत आहेत. 2 महान संघासोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. अप्रतिम प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांचे मनापासून आभार मानायला आवडेल. अशी भावना रायुडूने ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.

Web Title: Csk Ceo Kasi Viswanathan Clarifies After Ambati Rayudu Deletes Tweet Will Be My Last Ipl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top