
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या संघाने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा पराभूत करून गुजरात टायटन्सच्या संघाने विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात संघ जिंकला पण एका मोठ्या खेळाडूला गमवावे लागले. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला दुखापत झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. मंगळवारी 4 एप्रिलला संघाने त्याच्या बदलीची घोषणा केली.(Dasun Shanaka to join Gujarat Titans in IPL 2023)
श्रीलंकेचा कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू दासून शनाकाची अखेर आयपीएलमध्ये एंट्री झाली आहे. वृत्तानुसार गुजरात जायंट्सने केन विल्यमसनच्या जागी शनाकाचा समावेश केला आहे. आयपीएलपूर्वी, चाहते शनाकाला या ग्रँड लीगमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने करत होते. आता चाहत्यांची ही मागणी पूर्ण झाली असून लवकरच शनाका गुजरातकडून मैदानावर अॅक्शन करताना दिसणार आहे.
दासुन शनाकाची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते, जो बॉल आणि बॅटने उत्कृष्ट योगदान देताना दिसला. नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याबरोबरच मधल्या फळीत फलंदाजी करताना जलद धावा करण्याची जबाबदारी शनाका सांभाळू शकतो. याशिवाय शनाकाला टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याचाही भरपूर अनुभव आहे आणि त्याने या फॉरमॅटमध्ये १४० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.
शनाका दबावाच्या परिस्थितीतही एक चांगला खेळाडू असल्याचे सिद्ध करतो, जे त्याने आशिया चषक 2022 मध्ये दाखवून दिले जेव्हा त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण नाबाद 33 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली आणि बॉलसह 2 विकेट घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.