MI vs DC IPL 2024 : वानखेडे स्टेडियमवर ब्लंडर; मुंबई जिंकली तरी झळकले दिल्लीच्या विजयाचे बॅनर, DC नेही घेतली मजा

MI vs DC IPL 2024
MI vs DC IPL 2024esakal

MI vs DC IPL 2024 Wankhede Stadium Blunder : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 मधील आपला पहिला विजय साजरा केला. होम ग्राऊंड वानखेडेवर खेळताना मुंबईने 234 धावा ठोकल्या. तर दिल्लीने देखील कडवी टक्कर देत 205 धावांपर्यंत मजल मारली. मात्र रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात नॉर्खियाला ठोकलेल्या 32 धावांचा मोठा फरक पडला अन् मुंबईनं विजय मिळवला.

मात्र मुंबईच्या विजयात वानखेडे स्टेडियमवरील प्रशासनानं मोठा गोंधळ करून मिठाचा खडा टाकला. वानखेडे स्टेडियमवरील डिजीटल स्क्रीनंवर दिल्लीने 235 धावांनी विजय मिळवला असा मजकूर झळकला होता. आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

MI vs DC IPL 2024
Hardik Pandya MI vs DC : खूप प्रेम देणारी अन् काळजी घेणारी लोकं! पहिल्या विजयानंतर मुंबईचा कॅप्टन पांड्या म्हणाला तरी काय?

वानखेडे स्टेडियमवरील या मोठ्या ब्लंडरची मजा दिल्ली कॅपिटल्सने देखील घेतली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की दिल्ली आता शेवटच्या क्षाणाला या वाढलेल्या टार्गेटला बॅटनं उत्तर देण्याची वेळ आली आहे.'

MI vs DC IPL 2024
Rohit Sharma: दिल्लीविरुद्ध रो'हिट'! आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला विक्रम केला नावावर

सामन्याबद्दल बोलाचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 बाद 234 धावा केल्या. रोहित शर्माने 49 तर इशान किशनने 42 धावा करत 80 धावांची धडाकेबाज सलामी दिली. त्यानंतर हार्दिक पांड्याने सावध फलंदाजी करत 31 चेंडूत 39 धावा केल्या.

यानंतर मधल्या फळातील फलंदाज स्वस्तात माघारी गेल्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डने शेवटच्या 4 षटकात 84 धावा ठोकल्या. डेव्हिडने 21 चेंडूत 45 तर शेफर्डने 10 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने देखील 205 धावांपर्यंत मजल मारली. ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली. तर सलामीवीर पृथ्वी शॉने 40 चेंडूत 66 धावा ठोकल्या. मुंबईकडून जेराल्ड कॉड्झीने 4 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. कॉट्झीने आपल्या 4 विकेट्सपैकी 3 विकेट्स या शेवटच्या 20 व्या षटकात घेतल्या.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com