Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Delhi Capitals Captain Rishabh Pant Statement : आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला.
Rishabh Pant Statement After Winning Against Lucknow
Rishabh Pant Statement After Winning Against Lucknowsakal

Delhi Capitals Captain Rishabh Pant Statement : आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने स्वतःला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. मात्र या विजयानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आनंदी दिसला नाही. खरंतर, बंदीमुळे पंत शेवटचा सामना खेळू शकला नाही आणि दिल्लीला सामना गमवावा लागला.

Rishabh Pant Statement After Winning Against Lucknow
IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

जर मला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली असती तर आम्हाला पात्र होण्याची अधिक चांगली संधी मिळाली असती, असे पंत म्हणाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्लीचा शेवटचा सामना हरला होता, ज्यामध्ये अक्षर पटेलने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळली होती.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर पंत म्हणाला की, "नक्कीच निकोलस पूरन आमची परीक्षा घेत होता. पण आमच्या काही योजना होत्या, पण एकंदरीत सामना खूप चांगला होता. आम्ही चांगली गोलंदाजी केली. या हंगामाच्या सुरुवातीला काही खेळाडूंना दुखापत झाली होती, पण आम्ही शेवटच्या सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे.

Rishabh Pant Statement After Winning Against Lucknow
IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

पुढे पंत म्हणाला की, "जर मला शेवटच्या सामन्यात (आरसीबी विरुद्ध) खेळण्याची संधी मिळाली असती तर आम्हाला पात्रतेची चांगली संधी मिळाली असती. आणि वैयक्तिकरित्या पुनरागमन करणे खूप छान होते. संपूर्ण भारतातून मिळालेला पाठिंबा पाहून आनंद झाला. दीड वर्ष खूप प्रतीक्षा करावी लागली.

अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 208 धावा केल्या. अभिषेक पोरेलने संघाकडून सर्वात मोठी खेळी खेळली आणि 33 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकांत 9 गडी बाद 189 धावाच करता आल्या. निकोलस पुरनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 27 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 225.93 होता. मात्र, पुरणची खेळी लखनौला विजयाची रेषा ओलांडू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com