कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्श रूग्णालयात दाखल; IPL वरील संकट झाले गडद | Delhi Capitals Corona Positive Mitchell Marsh admitted in hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Capitals Corona Positive Mitchell Marsh admitted in hospital

कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्श रूग्णालयात दाखल; IPL वरील संकट झाले गडद

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला आता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करून दिली. दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन मार्शच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा: VIDEO : बटलर-पडिक्कलचे 'भाग मिल्खा भाग'; पळून मिळवला चौकार

दिल्ली कॅपिटल्सने म्हटले होते की, 'दिल्ली कॅपिटल्सच्या बायो बबलमधील अजून काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सुरुवातीला सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्या सर्वांना कोणतीच लक्षणे दिसत नाहीयेत. त्यांच्या प्रकृतीवर आमचे लक्ष आहे. बाकीच्या सर्व बायो बबलमधील सदस्यांना विलगीकरणात ठेवले आहे. ते त्यांच्या रूममध्ये विलगीकरणात आहेत. त्यांची सातत्याने चाचणी केली जात आहे.'

हेही वाचा: वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने समोसा खाऊन दिवस काढला?

दरम्यान, काही वेळापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत वक्तव्याचे ट्विट केले. त्यात त्यांनी 'दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक मार्शच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.'

शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मसाजर देखील कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. या दोघांनाही संघापासून वेगळे करून विलगीकरणात ठेवले आहे.

Web Title: Delhi Capitals Corona Positive Mitchell Marsh Admitted In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..