
Delhi Capitals Team Special Celebration for Father KL Rahul: काल दिल्ली कॅपिटल्स व लखनौ सुपर जायंट्स या केएल राहुलच्या आधीच्या व आत्ताच्या संघांमध्ये सामना झाला. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने रोमहर्षक विजय मिळवला. पण या सामन्याला विकेटकीपर फलंदाज केएल राहुल उपस्थित राहू शकला नाही.
क्रिकेटपटू केएल राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी हे काल आई-बाबा झाले. त्यामुळे राहुलला काल मुंबईत परतावे लागले. पण या गोड बातमीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने ड्रेसिंग रूममध्ये स्पेशल सेलिब्रेशन केले.