IPL 2022 : कोरोनाच्या शिरकावानंतर BCCI कडून वेळापत्रकात बदल | IPL 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022

IPL 2022 : कोरोनाच्या शिरकावानंतर BCCI कडून वेळापत्रकात बदल

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यामध्ये कोरोना संसर्ग (Corona In IPL) झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. त्यानंतर आता बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. (IPL 2022 DC VS Panjab Kings Match Venue Change)

सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय टीम फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि टीम डॉक्टर अभिजित साळवी, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य आकाश माने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीचा संघ सध्या मुंबईत असून सोमवारीच पुण्याला रवाना होणार होता, मात्र कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना हॉटेलमधील त्यांच्या खोलीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

15 एप्रिल रोजी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीमचा मसाज थेरपिस्ट चेतन कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एवढेच नव्हे तर, त्याच्या दोन दिवसांनी मिचेल मार्शलादेखील व्हायरसची लागण झाली. तसेच इतर सदस्य डॉ. अभिजित साळवी आणि सोशल मीडिया मॅनेजर आकाश माने यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे दिल्लीच्या ताफ्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Delhi Capitla Vs Royal Challengers Bangalore Pune Ipl Match Held On Mumbai Due To Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketIPL 2022
go to top