मुंबई इंडियन्सची जर्सी घालून कार्तिकने आठवण करून दिली की... Dinesh Karthik Share Photo Wearing Mumbai Indians Jersey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinesh Karthik Share Photo Wearing Mumbai Indians Jersey

मुंबई इंडियन्सची जर्सी घालून कार्तिकने आठवण करून दिली की...

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोर सध्या आपले देव पाण्यात घालून बसली आहे. कारण त्यांच्या प्ले ऑफचे स्वप्न मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) हातात आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) एकमेकांना भिडणार आहे. जर आजचा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला तर ते रनरेटच्या आधारावर प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. जर मुंबईने दिल्लीचा पराभव केला तर आरसीबी प्ले ऑफमध्ये (Play Off) दाखल होईल. यामुळेच आजच्या सामन्यात आरसीबीचा संपूर्ण संघ आणि त्यांचे चाहते देखील मुंबई इंडियन्सला जोरदार समर्थन देणार आहेत. दरम्यान, आरसीबीचा मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) देखील मुंबई इंडियन्सला लाडी गोडी लावण्याचा प्रयत्न केला. त्याने मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला आपला एक जुना फोटो शेअर केला. तो जणू मुंबई इंडियन्सला जुन्या नात्याची आठवण करून देत असावा.

हेही वाचा: बहिणीमुळे बनला बुद्धिबळाचा बादशाह : प्रग्नानंधाची कहाणी Photo

दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सकडून दोन हंगाम खेळले आहेत. पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला दिनेश कार्तिकने तो मुंबईकडून खेळत असतानाच्या दिवसांची आठवण करून दिली. त्याने मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील फोटो शेअर करत त्याला 'मला हा जुना फोटो सापडला.' इतकेच कॅप्शन दिले. याचबरोबर त्याने फिंगर क्रॉसचा इमोजी देखील शेअर केला.

हेही वाचा: IPL फायनल मॅचमध्ये असं कधीच घडलं नव्हतं, मात्र आमिर खान घडवून आणणार, वाचा..

दिनेश कार्तिक मुंबई इंडियन्सकडून 2012 आणि 2013 च्या हंगामात खेळला होता. तर कार्तिक दुसऱ्यांदा आरसीबीशी जोडला गेला आहे. तो यापूर्वी 2015 ला आरसीबीकडून खेळला होता. त्यावेळी त्याच्यावर तब्बल 10.5 कोटी रूपयांची बोली लागली होती. यंदाच्या हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या मेगा लिलावात आरसीबीने त्याला 5.5 कोटी रूपयांना खरेदी केले. दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात आरसीबीचा मॅच फिनिशर म्हणून भुमिका बजावली. त्याने 14 सामन्यात 191.33 च्या स्ट्राईक रेटने 287 धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या या कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळावे याची जोरदार मागणी सुरू आहे.

Web Title: Dinesh Karthik Share Photo Wearing Mumbai Indians Jersey Mi Vs Dc Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..