IPL 2025 GT VS LSG : गुजरात अव्वल स्थानी पकड कायम राखण्यासाठी सज्ज; तर रिषभ पंतच्या लखनऊसमोर सन्मान जपण्याचे आव्हान
gujarat titans vs lucknow super giants : गुजरात संघाने प्लेऑफचं तिकीट आधीच निश्चित केलं असून, अव्वल दोन क्रमांकांत स्थान टिकवण्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकणं गरजेचं आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या लखनऊ संघाला आता प्रतिष्ठा राखायची आहे.
अहमदाबाद : नावाजलेले खेळाडू असतानाही अडखळत असलेल्या लखनऊ संघाला पराभूत करून या आयपीएलमधील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्यासाठी गुजरातचा संघ आज मैदानात उतरेल. क्वॉलिफायर-१ हा सामना खेळण्यासाठी पहिल्या दोन क्रमांकांत स्थान मिळवणे आवश्यक असते.