
Dwayne Bravo Reveals he Join KKR After MS Dhoni Approval: इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामाची सुरूवात आज कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सामन्याने होणार आहे. गतविजेता केकेआर संघ नवनियुक्त कर्णधार अजिंक्य रहाणेच्य नेतृत्त्वात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तर यंदा केकेआरने कर्णधारासोबत मेंटॉरही बदलला आहे. सीएसकेचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो यावेळी केकेआरचा मेंटॉर असणार आहे. मेंटॉर ब्रॉव्होने केकेआर संघात सामील होण्यापूर्वी सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीची परवानगी घेतल्याचे सांगितले.