French Open 2026: २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष! २ तास ५१ मिनिटांच्या थरारात कसाबसा मिळवला विजय!

Novak Djokovic Survives Tough First Round: फ्रेंच ओपन २०२६ मध्ये इगा स्विअतेक, एलेना रायबकीना आणि नोवाक जोकोविच यांनी विजयी सलामी दिली. जोकोविचला मात्र दुसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी चार सेटपर्यंत संघर्ष करावा लागला.
French Open 2026

French Open 2026

esakal

Updated on

पॅरिस : फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी विजयी वाटचाल केली. तिसरी मानांकित पोलंडची टेनिसपटू इगा स्विअतेक व दुसरी मानांकित कझाकस्तानची एलेना रायबकीना यांनी महिला विभागातील एकेरी गटामध्ये अनुक्रमे ऑस्ट्रेलियाची इमरसन जोन्स व स्लोवेनियाची वेरोनिका इर्जावेक यांना पराभूत करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला मात्र सलामीच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने फ्रान्सच्या जिओवानी पेरिकार्ड याला पराभूत केले, मात्र यासाठी चार सेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com