Gautam Gambhir : आयपीएल हे बॉलीवूड, पार्टी याबद्दल नाही तर... शाहरूखच्या संघाला 'गंभीर' इशारा

Gautam Gambhir KKR : भाजपचा रोखठोक पठ्ठ्या केकेआरच्या पहिल्याच बैठकीत कडाडला, गौतमने हंगामच्या सुरूवातीलाच दिला गंभीर इशारा.
Gautam Gambhir
Gautam Gambhiresakal

Gautam Gambhir KKR IPL 2024 : क्रिकेटमधील जबाबदाऱ्या आहेत आपली आज्ञा घेतो असं सांगत गौतम गंभीरने राजकारणाला टाटा, बाय-बाय केले. त्यानंतर आता दिल्लीचे राजकारण एका रोखठोक व्यक्तीमत्वाला मुकले. मात्र आता हाच रोखठोखपणा केकेआरच्या संघात आला आहे. केकेआरला दोन विजेतेपदं जिंकून देणारा गौतम गंभीर आता केकेआरचा मेंटॉर आहे.

त्याने केकेआरची मेंटॉरशीप स्विकरताच ग्लॅमर मालकाच्या संघातील खेळाडूंना कडक शब्दात इशार दिला. त्याने आयपीएल हे माझ्यासाठी एन्जॉय करण्याचं व्यसपीठ नसल्यांच ठणकावून सांगितलं. तसेच त्याने आयपीएल हे स्पर्धात्म क्रिकेट असून तिथं तुम्ही गंभीरित्याच खेळलं पाहजे असेही तो म्हणाला.

Gautam Gambhir
IPL 2024 KL Rahul : केएल राहुल आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? फिटनेसवर आली मोठी अपडेट

या हंगामातील खेळाडूंच्या लिलावात गंभीर KKR च्या इतर सदस्यांसह उपस्थित होता, जेथे फ्रँचायझीने मिचेल स्टार्कला करारबद्ध करण्यासाठी विक्रमी 24.75 कोटी रुपये खर्च केले. तो म्हणाला, 'मी पहिल्या दिवशी स्पष्ट केले की आयपीएल माझ्यासाठी एक गंभीर बाब आहे. हे बॉलीवूडबद्दल नाही, ते तुमच्याबद्दल नाही, ते पार्टी आणि नंतरच्या इतर गोष्टींबद्दल नाही. ते मैदानावर जाऊन स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याबद्दल आहे आणि हेच कारण आहे. मला वाटते की ही जगातील सर्वात कठीण लीग आहे कारण ते योग्य क्रिकेट आहे.'

Gautam Gambhir
Ind Vs Eng 5th Test Weather Forecast : बर्फवृष्टी अन् पावसामुळे शेवटचा कसोटी सामना होणार रद्द? कसे आहे धरमशालातील हवामान

गंभीर पुढे म्हणाला की, 'इतर लीगपेक्षा आयपीएल ही कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाणारी आहे. जर तुम्हाला यशस्वी फ्रँचायजी म्हणून तुमचा ठसा उमटवायचा असेल, तर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर कामगिरी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.' चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स नंतर दोन किंवा अधिक आयपीएल विजेतेपद जिंकणारी KKR ही तिसरी फ्रँचायझी आहे. मात्र, गेल्या काही हंगामात त्याची स्थिती फार काही चांगली राहिलेली नाही. गेल्या दोन हंगामात हा संघ सातव्या स्थानावर राहिला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला.
(Cricket Latest News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com