Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला.
Glenn Maxwell IPL 2024
Glenn Maxwell IPL 2024esakal

Glenn Maxwell IPL 2024: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. यासह बेंगळुरूचा आयपीएलमधील प्रवास संपला तर राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला.

दरम्यान, या सामन्यात आरसीबीला ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण या सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली. हा आयपीएल हंगाम मॅक्सवेलसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद झाला.

Glenn Maxwell IPL 2024
IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

ग्लेन मॅक्सवेल हा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो, पण आयपीएल 2024 मध्ये त्याची बॅट एकदम शांत राहिली. या हंगामात त्याने 10 डावात 43 चेंडूंचा सामना करत फक्त आणि फक्त 52 धावा केल्या. या हंगामात मॅक्सवेलचा स्ट्राइक 120 आहे आणि सरासरी 5.8 राहिली. आणि या हंगमाता मॅक्सवेल 4 वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलला आरसीबीने 11 कोटी रुपयांना खरेदी करून संघाचा भाग बनवला होता. अशा परिस्थितीत, या हंगामात त्याच्या एका धावेची किंमत पाहिली तर ती 2,115,385 रुपये आहे.

Glenn Maxwell IPL 2024
RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

ग्लेन मॅक्सवेल आता आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक डकवर आऊट होणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत जोस बटलर आघाडीवर आहे. 2023 च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना तो 5 वेळा डक आउट झाला. या यादीत संयुक्तपणे 8 खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com