स्मिथची भविष्यवाणी! हे रेकॉर्ड मोडत चहल ठरणार सर्वाधिक विकेट टेकिंग बॉलर

एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा ब्राव्होचा विक्रम तो मोडू शकतो
Graeme Smith Feels Yuzvendra Chahal
Graeme Smith Feels Yuzvendra ChahalSAKAL

IPL 2022: आयपीएलच्या 15 हंगामातील 34 वा सामना राजस्थान विरुद्ध दिल्ली (Rajasthan Royals vs Delhi Capitals) त्याच्यात खेळला गेला. सामना सुरु होण्या अगोदर युझवेंद्र चहलबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने मोठे वक्तव्य केले आहे. ग्रॅमी स्मिथला वाटते की राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हो आणि 2021 मध्ये हर्षल पटेल यांचा आयपीएल हंगामात सर्वाधिक 32 बळी घेण्याचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. चहलने हॅट्ट्रिकसह 5/40 विकेट्स घेतल्या आणि RR ला कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवून दिला. चहल सध्या आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 11.33 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहे.(Graeme Smith Feels Yuzvendra Chahal)

Graeme Smith Feels Yuzvendra Chahal
IPL 2022: 'गुरु तसा चेला' धोनीप्रमाणेच पंतने देखील 'नो'बॉलवर घातला राडा

क्रिकेट डॉट कॉमने स्मिथच्या हवाल्याने म्हटले आहे की, चहलने अविश्वसनीय गोलंदाजी करत आहे. हंगाम जसजशी पुढे जाईल तसतसे त्याच्याकडून आणखी विकेट्स घेण्याची अपेक्षा आहे. त्याने आपला वेग चांगला वापरला आहे. मी त्याला चेंडू स्पिन करताना पाहिले आहे. रॉयल्सला पुढे नेण्याची त्याच्यात पूर्ण क्षमता आहे. एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा ब्राव्होचा विक्रम तो मोडू शकतो.

Graeme Smith Feels Yuzvendra Chahal
IPL 2022: हंगरगेकरचा 'तो' फोटो व्हायरल; CSK वर चाहते नाराज

स्मिथला वाटते की दिल्लीचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद कर्णधार ऋषभ पंतसाठी मौल्यवान गोलंदाज ठरू शकतो. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याच्या काही तास आधी टीम सेफर्टला कोरोना असूनही, दिल्लीने अष्टपैलू कामगिरी करत पंजाब किंग्जला नऊ विकेट्सने पराभूत केले, जिथे खलीलने 2/21 घेतले. खलील आयपीएल 2022 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 14.30 च्या सरासरीने 10 विकेट्स घेऊन सातव्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com