IPL 2024 GT vs SRH : गुजरात टायटन्सने हैदराबादला दिला 7 विकेट्सनी पराभवाचा धक्का

IPL 2024 GT vs SRH Live Score Updates Match News : सुपर सेंडमध्ये आज 31 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्स राखून पराभव केला.
IPL 2024 GT vs SRH Live Score Updates Marathi News
IPL 2024 GT vs SRH Live Score Updates Marathi Newsesakal

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2024 :

गुजरात टायटन्सने आपल्या होम ग्राऊंडवर विजयाचा धडाका कायम ठेवला. त्यांनी सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव करत आपला दुसरा विजय प्राप्त केला. हैदराबादने गुजरातसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 19.1 षटकात पार केलं. गुजरातकडून साई सुदर्शनने 45 तर डेव्हिड मलिरने नाबाद 45 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला गुजरात टायटन्सने 162 धावांत रोखले. गुजरातकडून अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादने सर्वाधिक 29 धावा केल्या. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला 30 धावांच्या पुढे धावा केल्या नाहीत. गुजरातकडून सर्व गोलंदाजांनी चांगला मारा केला. मात्र मोहित शर्माने स्लॉग ओव्हरमध्ये दमदार मारा करत 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

IPL 2024 GT vs SRH : गुजरात टायटन्सने हैदराबादला दिला 7 विकेट्सनी पराभवाचा धक्का

डेव्हिड मिलरने 19.1 षटकात षटकार मारत सनराईजर्स हैदराबादचे 163 धावांचे टार्गेट गुजरातला पूर्ण करून दिलं. गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव केला.

IPL 2024 GT vs SRH Live Score : साई सुदर्शन-मिलर यांची भागीदारी, गुजरातची सामन्यावर पकड

शुभमन गिल 36 धावा करून बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांनी भागीदारी रचत संघाला 15 षटकात 114 धावांपर्यंत पोहचवले. गुजरातला विजयासाठी 30 चेंडूत 49 धावांची गरज आहे.

IPL 2024 GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सचा आक्रमक सुरूवातीचा प्रयत्न मात्र शाहबाजने दिला पहिला धक्का

शाहबाज अहमदने गुजरात टायटन्सला मोठा धक्का दिला. सलामीवीर वृद्धीमान साहा 13 चेंडूत 25 धावा करून खेळत होता. त्याला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. गुजरातने 5 षटकात 1 बाद 45 धावा केल्या आहेत.

IPL 2024 GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सने हैदराबादला 162 धावात रोखलं; गोलंदाजांची सांघिक कामगिरी

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने शेवटच्या षटकात फक्त 3 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सनराईजर्स हैदराबादला 20 षटकात 8 बाद 162 धावांपर्यंतच मजल मारता आली.

हैदराबादचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

हैदराबादचा माजी कर्णधार एडेन मार्करमही या सामन्यात फार काही करू शकला नाही. क्लासेन पाठोपाठ तोही 15 व्या षटकात बाद झाला. त्याला उमेश यादवने टाकलेल्या चेंडूवर मार्करम राशिद खानकडे झेल देत बाद झाला.

मार्करमने 19 चेंडूत 17 धावा केल्या. मार्करम हैदराबादच्या 5 व्या विकेटच्या रुपात बाद झाला. हैदराबादने 15 षटकात 5 बाद 122 धावा केल्या.

राशिदने केले क्लासेनला क्लिन-बोल्ड

हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने नूर अहमदविरुद्ध लागोपाठ दोन षटकारही ठोकले होते. परंतु त्याला 14 व्या षटकात राशिद खानने त्रिफळाची केले. क्लासेनने 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 24 धावा केल्या. हैदराबादने 14 षटकात 4 बाद 109 धावा केल्या आहेत.

IPL 2024 GT vs SRH Live Score : आक्रमक खेळणारा अभिषेक शर्माही बाद

हैदराबादकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अभिषेक शर्माला मोहित शर्माने बाद केले. अभिषेकने फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक सुरुवात केली होती. परंतु, नंतर त्याच्या फलंदाजीला लगाम लागला. त्याला 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहितने अभिषेकला 29 धावांवर शुभमन गिलच्या हातून झेलबाद केले. हैदराबादने 10 षटकात 3 बाद 74 धावा केल्या.

IPL 2024 GT vs SRH Live Score : हैदराबादचे सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये

अग्रवालला ओमरझाईने बाद केल्यानंतर सलामीवीर ट्रेविस हेडचा अडथळा नूर अहमदने दूर केला. 7 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेडने स्लॉग स्विप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट आणि पॅडच्या मधून जात चेंडूने त्याचा मधला स्टंप उडवला. त्यामुळे हेड 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हैदराबादने 8 षटकात 2 बाद 64 धावा केल्या.

IPL 2024 GT vs SRH Live Score : मयंक अग्रवालचा संघर्ष कायम

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि ट्रेविस हेड यांनी सलामीला सुरुवात केली होती. परंतु, 34 धावांच्या सलामी भागीदारीनंतर मयंकला पाचव्या षटकात अझमतुल्ला ओमरझाईने दर्शन नळकांडेच्या हातून झेलबाद केले. मयंकने 17 चेंडूत 16 धावांची खेळी केली.

IPL 2024 GT vs SRH Live Score : असे आहेत गुजरात-हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद - मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल सामद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी राखीव खेळाडू - उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव

गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी राखीव खेळाडू - साई सुदर्शन, आर साई किशोर, शरथ बीआर, मानव सुतार, अभिनव मनोहर

IPL 2024 GT vs SRH Live Score : पॅट कमिन्सने जिंकला टॉस

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ प्रथम गोलंदाजी करेल.

या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही, तर गुजरातने दोन बदल केले आहेत. गुजरातने स्पेन्सर जॉन्सनच्या जागेवर नूर अहमदला आणि साई किशोरच्या जागेवर दर्शन नळकांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

IPL 2024 GT vs SRH Live Score : सनरायझर्स हैदराबादला धक्का

श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वनिंदू हसरंगा डाव्या टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 2024 हंगामातून बाहेर झाला आहे. तो आयपीएल 2024 स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्यामुळे हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com