GT vs DC IPL 2024 : दिल्लीनं गुजरातचा विषय 9 षटकातच संपवला; होम ग्राऊंडवर गिलला पंतनं दिलं मात

ujarat Titans Vs Delhi Capitals Live Cricket Score
ujarat Titans Vs Delhi Capitals Live Cricket ScoreESAKAL

Delhi Capitals Defeat Gujarat Titans IPL 2024 : दिल्लीचा आक्रमक स्वॅग, विकेट्स गमावल्या मात्र...

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचे 89 धावांचे आव्हान 4 फलंदाज आणि 8.5 षटकात पार करत सामना 6 विकेट्सनी जिंकला. दिल्लीने 89 धावांचे आव्हान पार करताना आक्रमकतेवर भर दिला. त्यांनी पहिल्यापासूनच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली.

जॅक मॅकगर्कने 10 चेंडूत 20 धावा चोपल्या. पॉवर प्लेमध्ये दिल्लीने 60 धावा पार केल्या होत्या. यामध्ये त्यांनी काही विकेट्सही गमावल्या. मात्र दिल्लीने आपला आक्रमक बाणा सोडला नाही.

शे होपने 19 धावांचे योगदान दिले तर कर्णधार पंतने 16 अन् अभिषेक पोरेलने 15 धावांची खेळी केली. गुजरातकडून संदीप वॉरियरने दोन तर राशिद खान आणि स्पेन्सरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या इतिहासातील आपली निच्चांकी धावसंख्या नोंदवली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दिल्लीने गुजरातचा संपूर्ण संघ 89 धावात पॅव्हेलियनमध्ये पाठवला. मुकेश कुमार आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर गुजराची 17.3 षटकात दाणादाण उडाली.

गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर साई सुदर्शन श्(12) आणि राहुल तेवतिया (10) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

GT vs DC Live Cricket Score : दिल्लीनं गुजरातचा विषय 9 षटकातच संपवला; होम ग्राऊंडवर गिलला पंतनं दिलं मात

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सने 89 धावांचे आव्हान 8.4 षटाकत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत सामना दिमाखात जिंकला. दिल्लीकडून जॅकने सर्वाधिक 20 तर शे होपने 19 धावा केल्या.

GT vs DC Live Cricket Score : नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातनं 89 धावात गाशा गुंडाळला

गुजरात टायटन्सला दिल्ली कॅपिटल्सने धक्क्यावर धक्के देत 89 धावात गाशा गुंडाळायला लावला. मुकेश कुमारने 3 तर इशांत शर्मा, ट्रिस्टन स्टब्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 31 धावा केल्या.

GT vs DC Live Cricket Score : स्टब्जनेही दिले धक्के; गुजरातचा सहावा फलंदाजही माघारी

पॉवर प्लेमध्ये वेगवान गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजीला खिंडार पाडल्यानंतर आता ट्रिस्टन स्टब्जने देखील जीटीला दोन धक्के दिले. त्याने अभिनव मनोहर आणि शाहरूख खान यांना बाद करत गुजरातची अवस्था 11 व्या षटकात 6 बाद 63 धावा अशी केली.

GT vs DC Live Cricket Score : दिल्लीनं गुजरातची अवस्था केली बिकट, पॉवर प्लेमध्येच तीन शिलेदार बाद

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दिल्लीनं पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केली. इशांत शर्माने 8 धावांवर गिलला बाद केलं. त्यानंतर मुकेश शर्माने वृद्धीमान साहाचा 2धावांवर त्रिफळा उडवला. तर साई किशोर 12 धावा करून धावबाद झाला. इशांतने डेव्हिड मिलरला देखील बाद करत दिल्लीची अवस्था 6 षटकात 4 बाद 30 धावा अशी केली.

GT vs DC Live Cricket Score : ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली

ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दिल्लीला दुखापतीचा फटका बसला असून डेव्हिड वॉर्नर बाहेर गेला असून त्याच्या ऐवजी सुमित कुमार संघात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com