GT vs PBKS Playing 11 IPL 2024 : पराभवानंतर पंजाबचा कर्णधार करणार संघात बदल... गिल विनिंग कॉम्बिनेशन घेऊनच मैदानात उतरणार?

Gujarat Titans Vs Punjab Kings Playing 11 IPL 2024
Gujarat Titans Vs Punjab Kings Playing 11 IPL 2024Esakal

Gujarat Titans Vs Punjab Kings Playing 11 : पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सने आपल्या होम ग्राऊंडवर पराभव केला. मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यातच पंजाबच्या तगड्या फलंदाजीला सुरूंग लावला. यादवच्या या वेगवान माऱ्याचा फटका सहन केलेला पंजाब आता गुजरात टायटन्सचा सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर करणार आहे. इथली खेळपट्टी फिरकीला पोषक समजली जाते. त्यामुळे पंजाबसमोर आता गुजरातच्या फिरकीचे आव्हान असणार आहे.

पंजाब किंग्जने आपलं होम ग्राऊंड सोडल्यापासून सलग दोन पराभव पाहिले आहेत. आरसीबीने अन् लखनौने शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबला पराभवाचे धक्के दिलेत. आता पंजाब गुजरात टायटन्सच्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्याने गेल्या सामन्यात तगड्या सनराईजर्स हैदराबादची शिकार केली होती. या विजयानंतर गुजरातचा आत्मविश्वास दुणावला असेल.

कशी असेल गुजरातची प्लेईंग 11?

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने गेल्या सामन्यात हैदराबादचा सहज पराभव केला होता. त्यामुळे गिल आपल्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता नाही. तो विनिंग कॉम्बिनेशनसहच खेळेल. जर गुजरातला संघात बदल करायचाच असेल तर ते केन विलियमसनला प्लेईंग 11 मध्ये स्थान देऊ शकतात.

गुजरातची संभाव्य प्लेईंग 11

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, केन विलियमसन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, अजमुल्लाह उमरजाई, राहुल तेवतिया, राशिद खान, अमेश यादव, दर्शन नाळकंडे, मोहित शर्मा

पंजाब किंग्ज प्लेईंग 11 मध्ये करणार बदल?

पंजाब किंग्ज आपल्या संघात एखादुसरा बदल करू शकते. दुखापतग्रस्त लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी सिकंदर रझाची वर्णी प्लेईंग 11 मध्ये लागू शकते. बाकी जॉनी बेअरस्टो आणि कगिसो रबाडा यांचे प्लेईंग 11 मधील स्थान अबाधित राहील. दुसरीकडे हर्षल पटेलला देखील म्हणावा तसा चांगला खेळ करता आलेला नाही. त्याच्या जागी ऋषी धवनला संधी दिली जाऊ शकते.

पंजाबची संभाव्य प्लेईंग 11

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिंकर रजा/राईली रूसो, सॅम करन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com