
Harbhajan Singh Compared Jofra Archer with Black Taxi: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग सध्या इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामात समालोचनाचे काम करत आहे. काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात हरभजनने वादग्रस्त विधान केले. काल घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादने धावांचा डोंगर उभा केला आणि पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. यावेळी हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा देखील समावेश होता. दरम्यान हरभजनने आर्चरची काळ्या टॅक्सीसोबत तुलना केली, त्यानंतर वातावरण चांगलचं चिघळलं आहे.