IPL 2022: हार्दिक कोणाकडून गिरवले कॅप्टन्सीचे धडे?

Hardik Pandya Statement About His Captaincy skills
Hardik Pandya Statement About His Captaincy skillsESAKAL

अहमदाबाद: आयपीएल २०२२ चा १५ व्या हंगामात (IPL 2022) लखनौ सुपरजायंट आणि अहमदाबाद (Ahmdabad) या दोन नव्या संघाचा समावेश केला आहे. अहमदाबाद संघाचे नेतृत्व विस्फोटक फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे तर लखनौ सुपरजायंटने पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुललाच (KL Rahul) आपल्या गोटात खेचले. दरम्यान, अहमदाबादने लोकल बॉय हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. कारण हार्दिक पांड्याला कोणीच नेतृत्व करताना पाहिलेले नाही. मात्र हार्दिक पांड्या रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली दीर्घ काळ खेळला आहे. (Hardik Pandya Statement About His Captaincy skills)

Hardik Pandya Statement About His Captaincy skills
IPL 2022: हार्दिक गोलंदाजीबद्दल म्हणतो, ते सरप्राईज असेल!

हार्दिक पांड्याने आपण कॅप्टन्सीबाबत (Hardik Pandya Capraincy) कोणाकडून गुरूमंत्र घेतला यावर पीटीआयशी बोलताना प्रकाश टाकला. त्याने सांगितले की, 'विराट कोहलीकडून मी आक्रमकता आणि पॅशन घेतली. त्याची मैदानावरची उर्जा जबरदस्त असते. माही भाईकडून शांतपणा, प्रत्येक परिस्थिती शांत राहणे, कोणत्या नव्या गोष्टी आपल्यामध्ये सामावून घेता येतील हे शिकलो.'

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जास्त काळ घालवला आहे. त्याबाबत हार्दिक पांड्या म्हणतो, 'रोहितकडून मी खेळाडूंना कसे स्वातंत्र्य द्यायचे हे शिकलो. खेळाडूला काय करायचे आहे ते त्याला ठरवू देणे हा गुण मी त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्व कर्णधारांच्या गुणांचे कॅम्बिनेशन जबदस्त होईल.'

Hardik Pandya Statement About His Captaincy skills
IPL मध्ये सिलेक्ट झाल्यावर सिराजनं आधी iPhone 7+ खरेदी केला अन् मग...

हार्दिक पांड्याने आपल्या कॅप्टन्सीचे तत्वज्ञान केले स्पष्ट

हार्दिक पांड्या आपल्या कॅप्टन्सीच्या तत्वज्ञानाबद्दल बोलताना म्हणाला की, 'जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत आहे तर कर्णधार म्हणून मी त्यात काही छेडछाड करणार नाही. पण, त्याची कामगिरी खालावली तर एक व्यक्ती म्हणून त्याला जर गरज असेल तर मी त्याच्यासाठी उपलब्ध असणार. ही गोष्ट मी नेतृत्व करताना फॉलो करणार आहे. कोणालाही माझी गरज असेल तर मी त्यासाठी उपलब्ध असणार.'

Hardik Pandya Statement About His Captaincy skills
IPL Mega Auction 2022 : ओम नम: शिवाय! श्रीसंतचा नंबर लागला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com