IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya wife natasa stankovic reaction

IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video

IPL 2022: आयपीएलच्या 35 व्या सामन्यात गुजरातने (Gujarat Titans) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव करत सहावा विजय मिळवला. या विजयासह हार्दिक पांड्याचा संघ पुन्हा एकदा टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. सामन्यात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) पिंच-हिटर सुनील नरेनसाठी आखलेल्या जाळ्यात अडकला आणि शिकार झाला. पांड्याची योग्य योजना मोहम्मद शमीने पार पाडली. केकेआरच्या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही रणनीती लागू करण्यात आली. शमीची डिलिव्हरी सुनील नरेनच्या शरीराच्या अगदी जवळ होती आणि पुल शॉटच्या प्रयत्नात नारायण जाळयामध्ये अडकला. सुनील नरेन पूर्णपणे हतबल झाला आणि शॉर्ट-थर्ड क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल घेतला.(Hardik Pandya Wife Natasa Stankovic Reaction)

हेही वाचा: IPL 2022: 'गुरु तसा चेला' धोनीप्रमाणेच पंतने देखील 'नो'बॉलवर घातला राडा

नरेनने हवेत शॉट खेळण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्याने डोके लावले आणि एका क्षेत्ररक्षकाला डीप बैकवर्ड पॉइंटवर ठेवण्यात आले. पुल शॉटवर सुनील नरेनला योग्य कनेक्शन मिळाले नाही आणि लॉकी फर्ग्युसनने त्याचा झेल घेतला. क्षेत्ररक्षणाचे उत्तम उदाहरण पांड्याने मांडले. त्याचवेळी या विकेटनंतर स्टँडवर बसलेल्या हार्दिकची पत्नी नताशाची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. नताशा आनंदाने नाचू लागली. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली. गुजरात संघाने 20 षटकात 9 विकेट गमावत 156 धावा केल्या. आंद्रे रसेलने 5 धावांत 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 148 धावाच करू शकला. गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Hardik Pandya Wife Natasa Stankovic Reaction On Sunil Narine Wicket Kkr Vs Gt Ipl 2022 Cricket News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top