
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या बालपणीच्या आठवणी त्याच्या शाळेच्या शिक्षिकेने सांगितल्या. कोहली सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे.