MS Dhoni Business : आंतरराष्ट्रीय शाळा ते फूटवेअर ब्रँड... धोनी नुसती शेती नाही तर करतो अनेक व्यवसाय

MS Dhoni Business Startups
MS Dhoni Business Startups esakal

MS Dhoni Business Startups : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने रेकॉर्ड पाचव्यांदा आयपीएल जिंकली. सलग दोन दिवस पावसाचा व्यत्यय आलेल्या फायनलमध्ये चेन्नईने गुजरातचा 5 विकेट्सनी पराभव केला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा अखेरचा हंगाम आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र चाहत्यांच्या प्रेमापोटी धोनीने अजून एक हंगाम खेळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. धोनीने आयपीएलमध्ये 250 सामन्यात 5 हजार 82 धावा केल्या आहेत. धोनीने 16 व्या हंगामात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीला सर्व स्टेडियममधून पाठिंबा मिळाला होता. धोनीने भारताला दोन वर्ल्डकप जिंकून दिल्याने धोनीचा भारतभर फॅन बेस असणे सहाजिकच आहे. धोनी फक्त त्याच्या क्रिकेट खेळातील क्षमतेमुळेच नाही तर त्याच्या इतर कार्यांसाठी देखील प्रसिद्धीत राहतो. धोनी कधी शेती करतो तर कधी कुकुटपालन करतो. मात्र धोनी फक्त शेती किंवा शेती पूरक व्यवसाय करत नाही तर इतर अनेक व्यवसायात धोनीने हात आजमावला आहे.

MS Dhoni Business Startups
CSK IPL 2023 : आमच्या कार्यकर्त्यामुळे CSK ने आयपीएल जिंकले.... तमिळनाडू BJP अध्यक्षांचं अजब वक्तव्य

रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट

महेंद्रसिंह धोनीची रिती नावाची एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये भागीदारी आहे. या कंपनीद्वारे जगभरातील अनेक मोठ्या खेळाडूंच्या मॅनेजमेंटचे काम केले जाते. आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस, भारतीय संघाचा कर्णधरा रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे क्लाईंट आहेत.

धोनीचा फूटवेअर ब्रँड

धोनीने 2016 मध्ये आपला कपड्याचा आणि फूटवेअर ब्रँड लाँच केला होता. ही कंपनी संपूर्णपणे धोनीच्या मालकीची आहे. धोनीने फूड आणि ब्रेवरेज कंपनीत देखील गुंतवणूक केली आहे. त्याने 7 In Brews या कंपनीत गुंतवणूक केली आहे. धोनीने कॉप्टर 7 नावाचा चॉकलेट ब्रँड देखील लाँच केला आहे. हा ब्रँड हेलीकॉप्टर शॉटची प्रेरणा घेत सुरू करण्यात आला आहे.

फिटनेसमध्ये देखील धोनीच

धोनी हा जगातील फिटेस्ट खेळाडूंमधली एक खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे धोनी फिटनेसला प्रमोट करणे सहाजिकच आहे. धोनीने स्पोर्ट्सफिट या नावाची एक फिटनेस चेन देखील सुरू केली आहे. या चेनअंतर्गत देशभरात जवळपास 200 पेक्षा जास्त फिटनेस सेंटर उघडण्यात आले आहेत.

हॉकी संघाची मालकी

धोनी हा आधी फुटबॉल खेळत होता. तो गोलकिपिंग करायचा हे सर्वांना माहितीच आहे. धोनी हा इतर खेळात देखील रस घेतो. त्यामुळेच त्याने हॉकी आणि फुटबॉल संघात गुंतवणूक केली आहे. धोनी इंडियन सुपर लीगच्या चेन्नई एफसी फुटबॉल क्लबचा मालक आहे. तर हॉकी टीम रांची रेंजचा देखील तो सहमालक आहे.

धोनीचे आंतरराष्ट्रीय शाळा

महेंद्रसिंह धोनीने बंगळुरूमध्ये एक आंतरराष्ट्रीय शाळा देखील सुरू केली आहे. धोनीच्या शाळेचे नाव एमएस धोनी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम असे आहे. धोनीच्या शाळेने मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला असून या अंतर्गत शाळेत प्रोग्रामिंग देखील शिकवले जाते.

प्रोड्युसर धोनी

धोनीने फिल्म जगतात देखील पाऊल ठेवले आहेत. त्याने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले असून त्याचे नाव धोनी एटरटेनमेंट असे आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसने गेट्स गेट मॅरिड या प्रोजेक्टमध्ये पैसा लावला आहे. ही एक तमिळ फिल्म आहे. याचे नुकतेच मूव्ही पोस्टर लाँच केली आहे.

MS Dhoni Business Startups
WTC Final 2023 : भारतीय निवडसमितीने कसोटी संघ निवडताना केली मोठी चूक; पाँटिंग म्हणाला...

फूड कंपनीत देखील गुंतवणूक

धोनीने शाका हॅरी नावाच्या एका स्टार्टअपमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ही कंपनी प्लांट बेस प्रोटीन बनवण्याचे काम करते. शाका हॅरी मध्ये धोनी बरोबरच मनू चंद्राची देखील गुंतवणूक आहे.

ड्रोन कंपनीतही धोनीने हात आजमावला

धोनीने एका टेक्नॉलॉजी कंपनीत देखील गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे नाव गरूड एरोस्पेस आहे. या कंपनीत धोनीची किती गुंतवणूक आहे याबाबत काही माहिती नाही. धोनी या कंपनीचा ब्रँड अम्बेसिडर देखील आहे. या कंपनीचे मुख्य काम हे ड्रोन बनवणे हे आहे.

हॉटेलचा देखील मालक

महेंद्रसिंह धोनीने हॉटेल व्यवसायात देखील प्रवेश केला आहे. झारखंची राजधानी रांचीमध्ये माही रेसिडेंसी नावाचे हॉटेल आहे. हे एकच हॉटेल असून ही काही चेन नाही. धोनीचे एकमेव हॉटेल हे रांचीत आहे.

धोनीची नेटवर्थ किती

धोनी अनेक व्यवसाय करत असल्याने त्याची संपत्ती देखील मोठी आहे. त्याची नेटवर्थ 1030 कोटी रूपये आहेत. धोनी सध्या सीएसकेचा सदस्य आहे. फ्रेंचायजी त्याला वर्षाला 12 कोटी रूपये देते. याशिवाय धोनी एका टीव्ही जाहिरातीसाठी 3.5 कोटी पासून 6 कोटी रूपयांपर्यंत रक्कम आकारतो. तो जवळपास 54 कंपन्यांची जाहिरात करतोय.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com