esakal | IPL 2021; CSK vs DC : चेन्नईकर कॅप्टन कूल धोनीनं ऐकला माजी मुंबईकराचा सल्ला; पण...
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नईकर कॅप्टन कूल धोनीनं ऐकला माजी मुंबईकराचा सल्ला; पण...

चेन्नईकर कॅप्टन कूल धोनीनं ऐकला माजी मुंबईकराचा सल्ला; पण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मिस्टर आयपीएल स्पेशलिस्टला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. रैना यंदाच्या हंगामात संघर्ष करताना दिसले. आयपीएलच्या इतिहासात 5000 + धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील असलेल्या रैनाने यूएईमध्ये खेळलेल्या पाच सामन्यात केवळ 37 धावा केल्या आहेत. यात 17 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

अनेक दिग्गजांनी रैनाच्या जागी चेन्नईनं आता संघात बदल करण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू शॉन पोलक यांनी रैनाच्या जागी चेन्नईने रॉबिन उथप्पाला संधी द्यावी असे मत व्यक्त केले होते. धोनीने त्याचा सल्ला ऐकल्याचे दिसते. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमधून रैनाचे नाव वगळण्यात आले. त्याच्या जागी रॉबिन उथप्पाला संधी मिळाली. एवढेच नाही तर मोईन अलीच्या आधी त्याला बढतीही मिळाली.

हेही वाचा: "या खेळाडूवर पुढच्या वर्षी लिलावात कोट्यवधींची बोली लागेल"

'क्रिकबझ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू शॉन पोलक याने रॉबिन उथप्पा रैनाचा योग्य पर्याय असल्याचे म्हटले होते. आयपीएल यंदाच्या हंगामात आतापर्यंत उथप्पाला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. चेन्नई सुपर किंग्जने 12 पैकी 9 सामन्यात विजय नोंदवला असला तरी रैनाची कामगिरी संघाची डोकेदुखी वाढवणारी होती. राजस्थान रॉयल्सने अखेरच्या सामन्यात चेन्नईला 7 विकेट्स राखून पराभूत केले होते.

हेही वाचा: "राहुल चांगला कर्णधार होऊच शकत नाही"

फाफ ड्युप्लेसिस लवकर बाद झाल्यानंतर उथप्पाला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधीही मिळाली. त्याने चांगली सुरुवात केली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. एका बाजूला विकेट पडत असताना संधीच सोनं करुन मोठ्या मॅचेससाठी चेन्नईच्या संघात स्थान पक्के करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण तो 19 धावा करुन माघारी परतला.

loading image
go to top